मूल्यशिक्षण..

मूल्यशिक्षण..sanskar

आपला भारत देश अफाट वेगाने प्रगती करीत आहे. मात्र, असे असतांनाही पाश्चात्य संस्कृतीचे होणारे अनुकरण हि निश्चितच चिंतेची बाब आहे. नुसती प्रगती महत्वाची नाही, तर तिला मुल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे. दूरदर्शन तसेच सिनेमा यातून दाखविल्या जाणाऱ्या विकृतींनी समाजात स्थान मिळविल्याचे निदर्शनास येते. लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे, संस्काराचे योग्य मार्गदर्शन केले तर निश्चितच ही परिस्थिती बदलू शकते. देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनातून मूल्यशिक्षणाची अत्यावश्यक गरज निर्माण झालेली आहे. परस्त्रीला मातेसमान मानायला शिकविणारी आपली संस्कृती, त्या स्त्रीला आपण देवी मानून देव्हाऱ्यात देखील बसविले. मात्र आज काल सर्रासपणे तिची विटंबना होतांना दिसते. हे थांबविण्यासाठी भारतीय मुल्यांचा प्रसार करण्याची गरज आहे. आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी, ढासळलेली मुल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात.

म्हणूनच आज घराघरातून मुल्यशिक्षण देण्याची गरज आहे.

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *