चित्रान्न
|
साहित्य :-
१) एक वाटी तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
२) पाव वाटी शेंगदाणे
३) पाव वाट पंढरपुरी डाळ
४) एक मोठा चमचा उडदाची डाळ
५) एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे
६) एक मोठा चमचा मेतकुट
७) साखर – मीठ
८) दहा-बारा कढीलिंबाची पान
९) लिंबाचा रस किंवा कैरीचा कीस
१०)तेल आणि कोथिंबीर .
कृती :-
१) भातामध्ये मीठ-साखर , मेतकुट आणि कैरीचा कीस किंवा लिंबाचा रस घालून भात सारखा करून ठेवावा .
२) कढईत तेल तापवून शेंगदाणे आणि डाळ तळून घेऊन भातात मिसळाव .
३) उरलेल्या तेलात मोहरी , उडीद डाळ , हिंग , हळद , मिरच्यांचे तुकडे , कढीपत्ता घालून ती फोडणी भातावर ओतून भात कालवावा .
४) कोथिंबीर घालून खायला द्यावा .