तिळाचा भात
|
साहित्य :-
१) एक वाटी तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
२) पाव वाटी शेंगदाणे किंवा काजूचे तुकडे
३) एक मोठा चमचा सुक्या मिरच्यांचे तुकडे
४) कढीलिंबाची दहा-बारा पान
५) एक चमचा उडदाची डाळ
६) मोहरी , हिंग
७) हळद , तेल
८) आवडीनुसार लिंबाचा रस
९) चवीनुसार मीठ .
तिळकुटासाठी :-
१) अर्धी वाटी तिळ
२) पाव वाटी किसलेलं खोबरं
३) पाच-सहा सुक्या मिरच्या
४) अर्धा चमचा हिंग
५) दोन चमचा तेल
६) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) तीळ कोरडे भाजून घ्यावे . तेलावर मिरच्या आणि खोबरं भाजून घेऊन त्यात तीळ , हिंग , मीठ घालून गार झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पूड करावी .
२) परातीत भात मोकळा करून घेऊन त्यामध्ये ही पूड मिसळावी .
३) थोडया तेलात शेंगदाणे , काजू तळून घेऊन ते भातात मिसळावे .
४) उरलेल्या तेलात मोहरी , हिंग , हळद , उडीद डाळ , सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता फोडणीला घालून ती फोडणी भातावर घालून भात कलवावा . लिंबाचा रस घालून खायला द्यावा .