कच्च्या फणसाची भाजी

anasa phansa bhaji1

 

साहित्य :-

१)      एक कच्चा फणस

२)     मध्यम आकाराचे कांदे तीन-चार

३)     लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच

४)     सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ

५)    तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा

६)      धने-जीऱ्याची पूड दोन चमचे

७)    काळा मसाला दोन चमचे

८)     कोथिंबीर अर्धी वाटी

९)      अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल

१०)   मोहरी , हळद , चवीपुरत मीठ .

कृती :-

१)      फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं.  हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .

२)     तीन कांदे भाजून घ्यावे .  सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत .  ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .

३)     फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा .  मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .

४)     फोडणीतच हळद घालावी .  भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा .  भाजी चांगली शिजवून घ्यावी .

५)    भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो .  चवीपुरत मीठ घालावं .

६)      भाजी काढल्यावर वरून शोभेसाठी थोडी कोथिंबीर , लिंबाच्या गोल चकत्या पसराव्या .

७)    वऱ्हाडात बहुतेक वेळा ही भाजी रसभाजीच करतात .  पण पश्चिम महाराष्ट्रात ही सुकी भाजीही करतात .

८)     तेव्हा त्यात हिंग , मेथीची पूड , धने-जीऱ्याची पूड हा मसाला वापरतात .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *