उपासाचे बटाटेवडे

babata vad

साहित्य :-

१)      एक बटाटा , मुठभर कोथिंबीर

२)     चार मिरच्या , मुठभर खोबरं

३)     दीड वाटी उपासाची भाजणी

४)     अर्धा चमचा किसलेलं आलं

५)    अर्धा चमचा साखर

६)      अर्धा चमचा जिरं पूड

७)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      आलं-मिरची , जिरं , खोबरं , थोडी कोथिंबीर , मीठ , साखर यांचं एकत्र     वाटण करावं .

२)     बटाट्याची सालं काढून किसून घ्यावा .  पाणी टाकून ठेवावा .  म्हणजे      बटाटा तांबडट होत नाही .

३)     उरलेली कोथिंबीर चिरून घ्यावी .  हे वाटण आणि कोथिंबीर उपासाच्या     भाजणीत घालावी .

४)     त्यातच पाण्यातून काढून बटाटा कीस टाकावा .  कणकेप्रमाणे पीठ भिजवावं .  लिंबापेक्षा जरा लहान गोळे करावेत .  प्लास्टिकच्या कागदावर पाण्याच्या हातानं छोटे छोटे वडे थापून तळावेत .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *