करममलाची भाजी

karamal chi bhaji

(‘करमल’ हे दक्षिण कोकणात पिकणारं आंबटसर चवीचं फळ आहे .  त्याचं लोणचं , भाजी छान होते .)

साहित्य :-

१)      करमलं तीन-चार

२)     मीठ , तिखट

३)     मेथी दाणे पाव चमचा

४)     फोडणीचं साहित्य

५)    ओलं खोबरं .

 

कृती :-

१)      करमलाच्या शिरा काढून त्याच्या फोडी कराव्यात .  त्यांना थोडा वेळ मीठ लावून ठेवावं .

२)     त्यानंतर तेलात मोहरी , हिंग , मेथी दाणे टाकून फोडणी करावी .

३)     त्यावर करमलाचे तुकडे टाकून परतावेत . 

४)     तिखट , मीठ खोबरं टाकून चांगले शिजवावेत .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *