राजमा

साहित्य :-Rajma Masala

१)      राजमा एक वाटी

२)     कांदे पाव किलो

३)     टोमाटो एक मोठा

४)     आलं एक इंच

५)    लसूण पाच-सहा पाकळ्या

६)      जिरं एक चमचा

७)    तिखट एक चमचा

८)     हळद , कोथिंबीर , तूप

९)      चवीनुसार मीठ . 

मसाल्यासाठी :-

१)      धने एक टीस्पून

२)     लवंगा तीन-चार

३)     हिरवे वेलदोडे दोन

४)     जिरं एक चमचा

५)    शहाजिरं अर्धा चमचा . 

कृती :-

१)      आदल्या रात्री राजमा भिजत घालावा .  भिजवताना पाण्यात खाण्याचा        सोडा घालावा . 

२)     दुसऱ्या दिवशी त्यातलं सोड्याचं पाणी काढून टाकावं .  राजमा जेवढा       असेल त्याच्या दुप्पट पाणी घालून तो कुकरमध्ये शिजण्यास ठेवावा . 

३)     नेहमीपेक्षा दोन शिट्टया जास्त कराव्या .  कांदा व टोमाटो बारीक चिरून     घ्यावा .  आलं-लसूण वाटून घ्या . 

४)     फ्रायिंग पैनमध्ये तूप गरम करून त्यात एक चमचा जिरं व कांदा फोडणीस टाकावा .  कांदा चांगला परतून त्यावर वाटलेलं आलं-लसूण परतावं . 

५)    त्याला तूप सुटू लागलं की त्यात हळद , तिखट , थोडं चवीनुसार आमचूर  घालावं .  टोमाटोच्या फोडी किंवा ग्रेव्ही करून टाकावी . 

६)      नंतर राजमा घालून हवं असल्यास पाणी घालावं . मीठ घालून उकळी आणून   वर कोथिंबीर घालावी .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *