अंड्याचे भुजणे

साहित्य :-egg_bhurji

१)      चार अंडी

२)     चार कांदे बारीक चिरलेले

३)     १/४ वाटी ओले खोबरे

४)     हळद , लाल तिखट

५)    गरम मसाला १/४ चमचा

६)      दोन मिरच्या , आले

७)    लसूण , एक डाव तूप

८)     कोथिंबीर बारीक चिरून

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तूप तापवून त्यात मिरची , आले , लसूण चिरून टाकावे व कांदा टाकून परतावे . 

२)     कांदा नरम झाला की हळद , लाल तिखट , चवीला मीठ , मसाला टाकून परतावे . 

३)     ऐल्युमिनीयमच्या थाळ्यात किंवा पसरट भांडयात हा कांदा काढून घेऊन          सगळीकडे  सारखा पसरून चार भाग करून त्याच्या प्रत्येक भागात मधे जरा खोलगट भाग करावा . 

४)     त्यात एक-एक अंडे फोडून टाकावे व ओव्होनमध्ये मंद आचेवर भाजावे . 

५)    किंवा गैसवर तवा ठेवून त्यावर अंडे ठेवून वर झाकण ठेवावे व भाजावे .  वाढताना   वरून कोथिंबीर टाकावी .  

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *