छोले-भटुरे , पाव
|१) पाव किलो कबुली चणे
२) २ ते ३ कांदे , ४ ते ५ टोमाटो
३) चिंचेचा रस थोडा चवीला , दोन तमालपत्र
४) तीन टेबल स्पून तेल , एक टेबल स्पून जिरे
५) दोन चमचे पादेलोण (काळ मीठ) , दोन चमचे तिखट
६) अर्धा चमचा गरम मसाला , पाव चमचा हळद
७) अर्धा चमचा कसूरी मेथी , कोथिंबीर
८) एक चमचा आले-लसूण पेस्ट
९) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत . दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये दोन शिट्टया येऊ देऊन थोडा वेळ गैस बारीक करून ठेवावा .
२) चणे नरम शिजले पाहिजेत . जिरे , काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी .
३) तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा . आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे .
४) टोमाटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे . कांदा-टोमाटो एकजीव झाला पाहिजे .
५) त्यात हळद , तिखट , थोडे मीठ , जिरे व काळे मीठ पावडर टाकून परतून घ्यावे . शिजवलेले चणे टाकावे .
६) चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे . चण्याला थोडा रस्सा ठेवावा . कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .
भटुरा :-
१) चार उकडलेले बटाटे किसून त्यात दोन ते तीन टेबल स्पून मैदा टाकावा , चिमुटभर खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकावी .
२) चवीनुसार मीठ टाकावे . सर्व एकत्र मळून त्याच्या मोठया पुऱ्या लाटून तळाव्या .
ब्रेडसोबत देतांना :-
१) ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर छोले टाकावे . बारीक चिरलेला कांदा टाकावा .
२) कांदयावर बारीक शेव टाकून वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .