पोहे चिवडा

साहित्य :-pohe chivada

१)      पाव किलो पातळ पोहे

२)     एक पळी तेल , शेंगदाणे

३)     पाच-सहा हिरव्या मिरच्या वाटून

४)      डाळ प्रत्येकी अर्धी वाटी

५)    एक चमचा तीळ

६)      धने पूड – जिरे पूड प्रत्येकी एक चमचा

७)    एक इंच आलं किसून

८)     कढीलिंबाची पानं दहा-बारा

९)      फोडणीच साहित्य

१०)  चमचाभर पिठीसाखर

११)   चवीनुसार मीठ .    

कृती :-

१)      पोहे उन्हात शेकून किंवा मंद आचेवर भाजून घ्यावेत .  एक पळी तेलाची मोहरी , हिंग , हळद , कढीलिंब घालून फोडणी करावी . 

२)     गैस बंद करून फोडणीत वाटलेली मिरची , शेंगदाणे , डाळं , तीळ घालावे .  पोहे घालून ढवळावे . 

३)     मग मीठ , पिठीसाखर , धने-जिरे पूड घालून परत ढवळावे .  वरून अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा . 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *