समोसे

साहित्य :-punjabi-samosa_med

१)      दोन कप मैदा

२)     एक मोठा चमचा दही

३)     एक मोठा चमचा तूप

४)     अर्धा चमचा बेकिंग पूड किंवा चिमुटभर सोडा

५)    एक चमचा मीठ .

सारण :-

१)      एक कप मटार वाफवलेले

२)     चार बटाटे उकडून बारीक चिरून

३)     दोन टोमाटो

४)     एक चमचा मीठ

५)    एक कांदा + कोथिंबीर एक मुठ + एक चमचा गरम                          मसाला + पाच-सहा मिरच्या यांचं मिश्रण

६)      एक मोठा चमचा तेल . 

कृती :-

१)      तेल गरम करून त्यातच टोमाटो चिरून घालावे .  कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं .  त्यातच वाटण घालून परतावं . 

२)     खरपूस झालं की बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट कालवावं .  

३)     मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं .  तूप घालून चांगलं चोळावं . 

४)     त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं .  अर्धा तास झाकून ठेवावं . 

५)    नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरीसाठी करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे . 

६)      प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत .  अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं .  (पाणी लावून चिकटवावं) . 

७)    नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत .  चाट करताना मधोमध फोडून कांदा , चटणी , शेव घालून दयावं . 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *