तांदळाची धिरडी

साहित्य :-rice paratha

१)      एक वाटी तांदळाचं पीठ

२)     एक वाटी दुध

३)     पाव वाटी पाणी

४)     एक चमचा साखर

५)    पाव चमचा जिरं

६)      थोडं तेल

७)    चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .  तेल सोडून इतर गोष्टी एकजीव करून घ्याव्या . 

२)     तवा तापला की नारळाची शेंडी किंवा चिंधीनं तव्याला तेल लावून घ्यावं . 

३)     एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण  ठेवावं .  चर्र आवाज आला की धिरडं उलटावं . 

४)     नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला .  एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं . 

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *