राजस्थानातील सहा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान

राजस्थानातील सहा किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. forts_rajasthan
राजस्थानातील प्रसिद्ध चित्तोडगड, कुंभालगड, सवाई माधवपूर, झालावर, जयपूर आणि जैसलमेर येथील सहा डोंगरी किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांत करण्यात आला आहे. ‘युनेस्को‘च्या जागतिक वारसा समितीने काल (शुक्रवारी) हा निर्णय जाहीर केला.
यातील काही गडांचा परीघ वीस किलोमीटर एवढा आहे. या गडांच्या सुंदर वास्तुशास्त्रावरून आठव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत बहरत गेलेली राजपुत संस्थानांची सत्ता लक्षात येते, असे ‘युनेस्को‘ने म्हटले आहे.
हे सहाही किल्ले सुस्थीतीत असून तेथील कलाकुसर नजरेंत भरण्याजोगी आहे. 

ह्या किल्ल्यांना भेट दिल्यावर प्राचीन भारतीय स्थापत्यशैली किती श्रीमंत होती याची प्रचीती येते. राजस्थानातील ही सहाही स्थळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले असून राजस्थानला भेट देणारे परदेशी पर्यटकही ह्या स्थळांना आवर्जून भेट देतात. युनेस्कोने ह्या सहा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करून प्राचीन भारतीय स्थापत्यशैलीचा गौरवच केला आहे.    

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *