हक्काच्या घरातील परकेपण

‘असावे घरटे आपेल छान’ ह्या ओळी तर प्रत्येकानेच ऐकल्याही असतील आणि अनुभवल्याही असतील. gharआपले हक्काचे, स्वतःचे घर असावे अशी इच्छा नसलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकालाच वाटते की, ‘आपलेही छानसे घर असावे तेथे आपण आणि आपली बायका-मुले सुखाने नांदू!’

प्रत्येकाने आपापल्या घराविषयी काही स्वप्ने बघितलेली असतात. योग आल्यावर ती स्वप्ने पूर्ण करण्याकडे त्याचा कल असतो. बऱ्याचदा नोकरी करता-करता आपल्या इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावतांना स्वतःचे घर करायला उशीर होतो. पार निवृत्तीकडे झुकल्यावर किंवा निवृत्तीनंतरच काहींच्या नशिबी स्वतःच्या मालकीचे घर येते. आपल्या घराविषयी आयुष्यभर बांधलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे मग त्याचा कल असतो. अमुक भिंतीला असा रंग द्यायचा, सोफा असाच घ्यावा, देवखोली इथेच करावी अशा नानाविविध कल्पना साकारण्यात तो गर्क होवून जातो. मात्र, मुळातच निवृत्तीकडे झुकलेला माणूस म्हणजे सुना-नातवंडांचा धनी असतो. स्वप्ने बघण्याचा अधिकार त्याला असतो, मात्र ते पूर्ण करण्याचा त्याचा अधिकार काहीसा डळमळीत होवून जातो.

काहीवेळा त्याच्या कल्पना ह्या आजच्या मॉडर्न युगात वावरणाऱ्या सुनेला किंवा नातवांना पटत नाही. ते त्यांना हवा तसाच रंग भिंतींना लावण्याचा किंवा फर्निचर अथवा इतर गोष्टी करण्याचा हेका चालवितात. अशावेळी त्याच्या हक्काची मुलेदेखील पत्नी-मुलांचीच बाजू घेतात. मग तो माणूस स्वतःच्याच घरात पाहुणा होवून जातो. त्याला स्वतःच्या मालकीचे घर तर मिळालेले असते, मात्र त्या घरावरील त्याचा अधिकार मात्र त्याला मिळत नाही. घराचे स्वप्न पूर्ण होवूनही काही अपूर्ण अपेक्षा सोबत घेऊनच मग तो आयुष्याची संध्याकाळ घालवितो.

हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल असे हि नाही पण हा एक अनुभव आहे ज्यातून फक्त इतकाच बोध आपण घेऊ शकतो कि वडील धर्यानी सुचीवलेली कुठलही गोष्ट लगेचच चुकीची आहे किंवा योग्य नाही असे म्हणू नये त्यांच्या भावनांचा दुखवू नये . आपण त्याचं मत प्रेमाने व आदराने ऐकून घेतले तर  त्यांना आपल्याकडून सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकतो .

तुमच मत या विषयावर कळवा

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *