मानवी आरोग्यासाठी फायदेशीर दोन उपक्रम
मानवी आरोग्यासाठी खालील दोन उपक्रम फायदेशीर असतात…
1) सकाळी लवकर उठून फिरावयास जाणे :- साधारणतः पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान हवेत गारठ्यासोबत ओझोन वायुही विपुल प्रमाणात असतो. हा वायू शरीरासाठी पोषक असतो. तो तत्व निर्माण करतो. त्यामुळे उत्साह वाढीस लागतो. ओझोन वायू हृदयाकरीताही खूपच फायदेशीर असतो. म्हणूनच सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे शरीरासोबत हृदयाचेही संतुलन राखण्यास मदत होते. हृदयाची कार्यक्षमताही वाढीस लागते. रक्तप्रवाहही सुरुळीत होतो. सकाळी फिरण्याची सवय मधुमेहींसाठी खूपच फायदेशीर असते.
2) नियमित व्यायाम करणे :- रोज किमान अर्धा-पाऊण तास हलका-फुलका व्यायाम करावा. त्यामुळे शरीरातील मांस-पेशी जागृत होतात. दिवसभर उत्साह वाटत असतो. व्यायामासोबतच कपालभारती व लोमलोम हा प्राणायाम केल्याने फारच फायदेशीर ठरते. कपालभारतीने पचनप्रक्रिया सुलभ होते. तर, लोमलोमने मस्तिष्क व डोळ्यातील व्यायामाने नसानसांत रक्तप्रवाह सुलभ होतो.
वरील दोन्ही उपक्रम नियमित केल्याने मानवी आयुष्यमान नश्चितच वाढते, तसेच गंभीर आजारही दूर राहतात.
Related Posts
-
जेवण केल्यानंतर हे कराच .
No Comments | Oct 28, 2014 -
शरीराचा शत्रू आम्लपित्त
2 Comments | Oct 22, 2013 -
व्यसनामुळे ओढवते नामुष्की…..!
1 Comment | Sep 26, 2013 -
भाजल्यास अशी घ्या काळजी
No Comments | Oct 22, 2013
all should follow this very from the 16 yrs age.in winter timing can be 5am to 7am