अशी राखा केसांची निगा
| केस चांगले दिसावेत याकरिता प्रत्येक व्यक्ती नाना क्लुप्त्या शोधात असतो. कित्येकदा त्याने फायदा होतो ही, मात्र याग्य माहिती नसल्यास तोटाही होऊ शकतो. केसांची निगा राखण्यासाठी काही आवश्यक उपाय खाली देत आहोत.
१) आठवड्यातून दोनदा कोमट तेलाने मसाज करावा. आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे.
२) शाम्पूचा अतिवापर टाळावा. केस धुण्यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई, नागरमोथा, कपूर, सुगंधी या मिश्रणाचा वापर केल्यास फायदा होतो. वरिल मिश्रण दळून ज्या दिवशी केस धुवायचे असतील, त्या दिवशी दोन ते तीन चमचे घेवून पाण्यात मिसळावेत व पाणी निम्मे होईपर्यंत उकळावे. हे मिश्रण उकळताना त्यात कॉफी पावडर टाकावी.
३) महिन्यातून एकदा केसांना मेहंदी अवश्य लावावी.मेहंदी dry झाल्यानंतर तेल लावणे गरजेचे आहे.
2 Comments
pan ya saglya padarthanni kesatle tel swachh hoil ka…..????
pan nagarmoche,kapur,sugandhi he kuthe miltil