सदाबहार गायक मन्ना डे ‘कालवश’…..

     index‘ए भाय, जरा देख के चलो…!’ म्हणत खुल्या डोळ्यांनी जगाकडे पाहण्याची उमेद देणारे ख्यातनाम गायक प्रबोधचंद्र डे म्हणजेच मन्ना डे यांचे आज २४ ऑक्टोबर २०१३ रोजी दुःखद  निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ वर्ष होते. १ मे १९१९   रोजी जन्मलेल्या मन्नाडेंनी १९४२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तमन्ना’ चित्रपटापासून त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची कारगिर्द सुरु केली. आजतागायत सुमारे चार हजार गाणी आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी अजरामर केलीत.

     काहीसा नटखट, नाटकी, विनोदी आणि उत्साहपूर्ण मिजास असलेली गीतं त्यांच्या आवाजात अधिकच खुलत असत. ‘ऐ मेरी जोहराजबीँ, पुछो ना कैसे बितायी रैना,  प्यार हुआ इकरार हुआ, एक चतुर नार, ए भाय! जरा देख के चलो,लागा चुनरी में दाग छुपाउँ कैसे, अभी तो मैं जवान हूँ, मेरे भैंस को डंडा क्यों मारा’ हि त्यांची काही गाजलेली गाणी जी आजही लोकप्रिय आहेत.

     आपल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना २००७ साली सन्मानित करण्यात आले होते.

     मन्ना डे जरी आज आपल्यातून गेले असले तरीही त्यांच्या सदाबहार गीतांमुळे ते कायम अजरामर राहतील!

     ‘m4marathi’च्या परिवारातर्फेमन्ना डेंना भावपूर्ण श्रद्धांजली!

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *