आता पाणी पिण्याच्या वेळेचाही “अलार्म”…..!
| आश्चर्य वाटलं न असे वाचून? मात्र हे खरं आहे! स्मार्टफोनच्या ह्या जमान्यात एक असे अँप तयार केल आहे टे आपल्या आवश्यक्तेनुसार आपण केव्हा आणि किती पाणी प्यावे हे तुम्हांला सांगेल. ह्या अँपचे नाव आहे ‘वॉटर युवर बॉडी’. आपली सकाळी उठण्याची वेळ आणि रात्री झोपण्याची वेळ, इतर शारीरिक माहिती जर आपण ह्या अँप मध्ये फीड केली तर हे अँप आपल्याला पाणी पिण्याचे प्रमाण आणि वेळ सुचवेल.
तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद तुम्ही करून ठेवायची. त्यासाठी या अँपमध्ये अगदी सहज निवडता येतील असे पर्याय आहेत. लहान कप, मोठा मग, लहान बाटली, मोठी बाटली अशा स्वरूपात तुम्ही या नोंदी करू शकता. शिवाय हे अँप तुम्हाला मध्ये मध्ये अगदी इंटरेस्टिंग माहिती आणि टिप्सही देईल.
सुरु वातीला अगदी साधीशी किंवा अगदी गरज नसलेली गोष्ट जरी ही वाटत असली तरी सवय अंगवळणी पडल्यावर लक्षात येईल की, आपण किती कमी पाणी पीत होतो किंवा किती मोठय़ा गॅपनंतर पाणी पीत होतो. एक चांगली सवय लावून घेण्यासाठी हे अँप डाऊनलोड करायला हरकत नाही.
अँण्ड्राईड मार्केट म्हणजेच गुगल प्ले स्टोअरमध्ये हे अँप फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
आता पाणी पिण्याच्या वेळेचाही “अलार्म”…..!
Posted by yashpal bagul on November 11, 2013
index आश्चर्य वाटलं न असे वाचून? मात्र हे खरं आहे! स्मार्टफोनच्या ह्या जमान्यात एक असे अँप तयार केल आहे टे आपल्या आवश्यक्तेनुसार आपण केव्हा आणि किती पाणी प्यावे हे तुम्हांला सांगेल. ह्या अँपचे नाव आहे ‘वॉटर युवर बॉडी’. आपली सकाळी उठण्याची वेळ आणि रात्री झोपण्याची वेळ, इतर शारीरिक माहिती जर आपण ह्या अँप मध्ये फीड केली तर हे अँप आपल्याला पाणी पिण्याचे प्रमाण आणि वेळ सुचवेल.
तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद तुम्ही करून ठेवायची. त्यासाठी या अँपमध्ये अगदी सहज निवडता येतील असे पर्याय आहेत. लहान कप, मोठा मग, लहान बाटली, मोठी बाटली अशा स्वरूपात तुम्ही या नोंदी करू शकता. शिवाय हे अँप तुम्हाला मध्ये मध्ये अगदी इंटरेस्टिंग माहिती आणि टिप्सही देईल.
सुरु वातीला अगदी साधीशी किंवा अगदी गरज नसलेली गोष्ट जरी ही वाटत असली तरी सवय अंगवळणी पडल्यावर लक्षात येईल की, आपण किती कमी पाणी पीत होतो किंवा किती मोठय़ा गॅपनंतर पाणी पीत होतो. एक चांगली सवय लावून घेण्यासाठी हे अँप डाऊनलोड करायला हरकत नाही.
अँण्ड्राईड मार्केट म्हणजेच गुगल प्ले स्टोअरमध्ये हे अँप फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
बाई बी ‘मानुस’ असती …..?
Posted by Samidha on November 17, 2013
‘ती’ नवी नवेली
डोळ्यातले स्वप्न। ….!
नव्याचे नऊ दिवस
झाले भग्न ….!
पहिल्याच दिवाळीत
फाड़ फाड़ थोबाडीत ….!
चार बुकं शिकून
मास्तरिन झालीस …?
हाताला पिरगळुन
कोप-यात ढकलली …!
सासुनं देऊन हात ….
अगं नवराच तो ….
त्याला कसली मात ….!
नव-याला प्रश्न करतीस …?
मग खायची लाथ ….!!!
शिकून शहाणी झालेली …
बाई बी ‘मानुस’ असती
याची जाण आलेली …!
कदी मदी प्रश्न करायची
पण ….
उत्तराच्या बदल्यात
थोबाडीत बसायची …!
…… आता ती आत आत मिटलेली
आसवं पुसून … आवंढा गीळायची
सुजलेल्या चेह-यानं
पाणी भरायची
सडा सारवण करून
निमूट सारे ऐकायची
वाटलंच काही मनावेगळ
तर … लगेच मन आवरायचि ….!!
बुकात शिकलेल्या
सगळ्या गोष्टी
सरपण म्हणून
चुलीत ढकलायची ….!!!
अनं ….
रोज रात्री पुसलेल्या
रांगोळीत ….
सकाळी ….
नव्या निश्चयाचे …
नवे रंग भरायची ……!!!
“समिधा “