चिऊताई गेली कुठ ?

                                House_Sparrow,_England_-_May_09           ते दिवस केव्हाच गेले जेव्हा घर अस्तित्वात होती,स्वयंपाकाचा वास येताच पाखर अंगणात यायची अन चोचीत दोन घास घेउनि पोटभर आशीर्वाद दयायची .आता मात्र परिस्थिती बदलली आहे,वाडत्या प्रदुषणामुळे तसेच mobile towers मुले हल्ली सगळ्यांची आवडती चिऊताई व तिचे इतर जोडीदार पक्षी दिशेनाशे झाले आहेत.
एकेकाळी पाखरांची शाळा सुटली अस म्हणून आई उडणाऱ्या पाखरांच्या थव्याकडे हात करायची आणि त्यामुळे रडणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर हास्य रेषा खुलायची,तो पक्षांचा किलबिलाट,कोकिळेची कुहूकुहू,दाणे टिपणाऱ्या चिमन्यांचा थवा आता शोधूनही सापडतं नाही.
ह्याला जबाबदार आहे तो मनुष्य ज्याने पर्यावरणाचा समोतोल इतका बिघडून टाकला की पाखरांचा अस्तित्व पुर्णपणे धोक्यात आलं आहे.
 mobile towers च्या ध्वनी लहरींमुळे पक्षांना उडण्यास अडथळा निर्माण होतो,प्रदूषित हवेमुळे दरवर्षी हजारो पक्षी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे पाखरांचा मुका झालेला किलबिलाट अतिशय चिंतेचा विषय झाला आहे.
चिमण्यांची संख्या माणसाने केलेल्या निसर्गाच्या -हासामुळेच कमी झाली आहे.
त्यामुळे नागरीकांनीच स्वताचे कर्तव्य समजून त्यांची संख्या वाढविण्यास जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
घर बांधताना पक्ष्यांच्या घरट्यांसाठी थोडी जागा ठेवावी,घराच्या आवारात,बागेत पक्ष्यांचा वावर राहावा याची सोय ठेवावी.उन्हाळ्यात घराच्या छपरावर वाटीत थोडे पाणी ठेवावे जेणेकरून वाट चुकलेल्या पाखरांना दोन घोट तरी पाणी मिळेल…।
One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *