अवघा महाराष्ट्र विकणे आहे ?

 

छत्रपती शिवरायांना आपण किती हृदयात जपलं आहे,ह्याचं प्रमाण देण्याची गरज नाही .kille
मात्र त्यांनी ठेवलेल्या वारसांना (गड-किल्ल्यांना )आपण किती जपतो आहोत खरंतर ह्याचं उत्तर शोधलं जायला हव.
महाराजांनी वारसात ठेवलेले गड-किल्ले आज आपल्याला आपल्या करंटेपणाची जाणीव करून देतातच,शिवाय आपल्या कुजकामी सरकारची तसेच पुरातत्व खात्याच्या ढिसाळ यंत्रणेची देखील ओळख करून देतात.
गडकिल्ल्यांबाबत उदासीनतेचा एक ढळढळीत पुरावा पुढे आला असून, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील यशवंतगडाची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवडकर यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उजेडात आणली आहे.राजापूर तालुक्यात नाटे या जैतापूर खाडीकिनारी वसलेल्या गावात सोळाव्या शतकात विजापूरकरांनी उभारलेला ऐतिहासिक यशवंतगड आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार या गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे असून, त्यांनी ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना त्याची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना गडाची विक्री झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वच किल्ले राष्ट्रीय मालमत्ता बनले असताना हा किल्ला पत्की यांच्या मालकीचा कसा, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

समीर शिरवडकर यांनी २३ ऑगस्ट २०१३ ला नाटे येथील मंडल अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यात या जलदुर्गाची ९९ वर्षांच्या भाडेकराराने विक्री झाल्याचे उघडकीस आले. राजापूर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि पुरातत्त्व विभाग यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे किल्ल्याच्या विक्री व्यवहाराचे गौडबंगाल वाढले असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.
गड-किल्ले हेच खर स्मारक असे सांगणारे राजकारणी,शिवस्मारकाच गाजर दाखवणाऱ् सरकार ,आणि उठसूट शिवरायांच्या नावाने पेटवा-पेटवी करणारे राजकीय पक्ष.

ह्या प्रकरणाची आता कशा प्रकारची दखल घेतात,हे उत्सुक्याच ठरेल.
पण असला लाजीरवाणा आणि स्वार्थीपणा पाहुन असेच वाटते कि एक दिवस ह्या महाराष्ट्राचा देखील लिलाव झाल्या शिवाय राहणार नाही.
One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *