प्रेम की गुन्हा ?

p
पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अजुनही प्रतिगामी विचारसरणी बदललेली दिसून येत नाही,
जातीचा कलंक अजुनही इथल्या व्यवस्थेला गोचीडासारखा चिकटलेला दिसुन येतो. 
नगर जिल्ह्यातील खर्डा या गावी नितीन आगे ह्या दलीत समाजातील मुलाचा प्रेम-प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांकडून खून झाला. 
हि हत्या नुसत प्रेम केलं ह्या एवड्याश्या कारणावरून झाली नाही तर,एका दलित मुलाने सवर्ण समजल्या जाणार्या जाती मधल्या मुलीवर प्रेम केलं,
आणि हि गोष्ट त्यांच्या इब्रतीला साजेनाशी होती. 
मुळात प्रेम हि भावना जागृत होत असतांना जाती-पातीच्या भिंती मध्ये येत  नसतात,मात्र त्याचं प्रकटीकरण समाजासमोर झाल्यावर त्याचं उच्चाटन करण्यासाठी अश्या पद्धतीच्या घटना म्हणजे माणुसकीला लागलेला डाग आहे. 
प्रशासनाने ह्या गोष्टीची गंभीर दखल जरी घेतली असली तरी,न्यायाची अपेक्षा किती खरी ठरणार हा उत्सुक्याचा विषय आहे. मात्र महाराष्ट्र सारख्या पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या राज्यात जातीच उच्चाटन अजूनही झालेलं नाही. प्रेम करणारी मन जरी समाजाच्या नजरेत गुन्हेगार ठरत असतील तरी,त्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी त्या व्यक्तींचा गळाच घोटायाचा ह्याला  कुठला न्याय म्हणायचा. 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *