डीप क्लिन्झिंग
|त्वचेवरील मृत त्वचा (डेड सेल्स) काढण्यासाठी डीप क्लिन्झिंग केले जाते . त्वचेचा पोत , रंग यामुळे चांगला होतो .

घरच्या घरी डीप क्लिन्झिंग करण्यास पुढील Pack वापरावे :-
१) ओट मील व दही एकत्र पेस्ट करून चेहऱ्यावर लावावे . पाच ते सात मिनिटाने हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुवावा . ओट वापरण्याचे कारण त्वचेला स्मुथनेस येतो व डेड सेल्स चागंल्या प्रकारे निघतात .
२) डेमीरार शुगर (ब्राऊन शुगर) व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावे . हात ओले असताना हळूवार मसाज करून साखर विरघळेपर्यंत ठेवून मग चेहरा कोमट पाण्याने धुवावा .
३) त्रिफळा चूर्ण व फेसवॉश क्लिन्झिंग मिल्क एकत्र करून लगेच चेहऱ्यावर लावावे .