जपा डोळ्यांचे आरोग्य
ऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी येणे, सुजणे यासारख्या लक्षणावरून डोळ्याची अँलर्जी लक्षात येते. असा त्रास जाणवताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र दरम्यान काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. डोळ्यांना संसर्ग झाल्यास सतत चोळणे, पुसणे टाळावे. त्याऐवजी गार पाण्याचे हबके मारत राहावे. ते सहन होत नसल्यास डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांमधला अँलर्जीस कारणीभूत घटकांचा प्रभाव कमी होतो. सध्या डोळ्यामधले इन्फेक्शन कमी करणारे अनेक ड्रॉप्स मिळतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याचा वापर करावा. डोळ्यांना संसर्ग असल्यास प्रखर उन्हात जाण्याचे टाळावे. गॅसच्या जवळ जाणे टाळावे. डोळ्यातून पाणी येत असल्यास ते पुसण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या कापडाचा वापर करावा.
Related Posts
-
पाणी पिताय ना?
No Comments | Oct 12, 2014 -
व्यायामाला पर्याय नाही
No Comments | Nov 1, 2014 -
का करावं स्विमिंग?
No Comments | Oct 22, 2014 -
गालफुगी
No Comments | Nov 8, 2013