सौंदर्य खुलवितांना मान

neck care tips in marathi
neck care tips in marathi

सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ , तेजस्वी चेहऱ्यासोबत सुडौल , नितळ मान , गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात .

सकाळी व रात्री मानेची पुढीलप्रमाणे निगा राखावी :-

१)      क्लिन्झिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी .  यासाठी साधे दुधही वापरता येईल .  यामुळे मेकअप , क्रीम इ. साफ होईल .

२)     चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटे धुवावे .

३)     लिंबूरस , दुध पावडर , गुलाबपाणी एकत्र करून मानेला लावावे .  वीस मिनिटांनी धुवावे .  रेशमी कापडाने मान/गळा हलकेच घासावे .  त्वचा स्वच्छ , तेजस्वी होते .

४)     बदाम तेल , कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे .  ती मसाज क्रीम बोटांना लावून हळूवारपणे मसाज करावा .

५)    ओटचे जाडसर पीठ , लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा .  तो मसाज केलेला थर अर्धा तास ठेवून काढावा .  नंतर मॉइश्चरायझर लावावे .  दही व ओटमुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंगसारखा फायदा मिळतो .

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *