कुंकुवाच देण
|तुझ रोजचच येण,
कुंकुवाच्या बोटाला त्या
इजा करूनही जान .
फटका हा संसार असा
पाहुनी डोळ्यादेखत हसण ,
आनंदाच्या क्षणावारती
मिठाचा खडा ठेऊनी जण .
सुवासिनिच देण असूनही
सौभाग्याच आसुसलेलच लेण ,
कुइरीमधल्या हळदीला
रोजच फोडणी मधल जळण .
समोरासमोर असूनही
अनोळखी जगन,
तुटल्या ताऱ्याला त्या
रोज एकच हे मागण .
येवूनी माझ्या घरा
भर सुखाचा हा घडा ,
पैसा अडका नको
मायेची सावली देवूनी जा.
रोजच काळोख दाखवतोस
एक दिवस उजेडहि दाखव ,
नकोत फुले माझ्या अंगणी
मोगऱ्याचा गंध तरी पसरव .
असच येत जा माझ्या घरी
बघत जा,माझ सरणावरच घरट ,
रोज चुकविते माय माझी
कस कुंकवाच देण ……………
– अंकुश विवेक जोशी