गुणकारी फळ मोसंबी

orangeमोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *