अंड्याची भाजी

अंड्याची भाजी
अंड्याची भाजी

 

 

साहित्य :-

१)      दोन अंडी

२)     चण्याचे डाळीचं पीठ

३)     तळण्यासाठी तेल

४)     पीठ भिजवण्यासाठी पाणी

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      दोन अंडी उकडून त्याचे प्रत्येकी चार तुकडे करावे . एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ भज्यांच्या पिठासारखे भिजवावे .

२)     त्यात चवीला मीठ व किंचित खाण्याचा सोडा टाकावा .  अंड्याचा एक-एक तुकडा पिठात भिजवून ज्या पद्धतीने भजे तळतात त्याप्रमाणे तेलात तळून घ्यावे .

३)     असे सर्व तुकडे तळावेत .  चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस सोबत खावे .

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *