इन्स्टट रवा इडली

Instant Rava Idli
Instant Rava Idli

साहित्य :-

१)      दोन वाटया मध्यम रवा

२)     दोन वाटया दही

३)     चार-पाच हिरव्या मिरच्या

४)     आलं अर्धा इंच

५)    दहा-बारा कढीलिंबाची पानं

६)      चिरलेली कोथिंबीर

७)    एक मोठा चमचा साजूक तूप

८)     अर्धा चमचा खायचा सोडा

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      मिरची , आलं आणि कढीलिंबाची पानं मिक्सरमधून बारीक करावीत .

२)     रव्यात हे वाटण तसंच दही , तूप , मीठ , कोथिंबीर आणि खायचा सोडा    घालून थलथलीत पीठ बनवावं .

३)     लगेच इडली साच्याला तेल लावून त्यात तयार केलेलं पीठ टाकावं .

४)     पंधरा मिनिटं वाफवावं .  याबरोबर वेगळी चटणी दयायची गरज नाही .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *