पोहे

साहित्य :-poha

१)      दोन वाट्या जाड पोहे

२)     एक वाटी कांदा बारीक चिरून

३)     तीन-चार हिरव्या मिरच्या

४)     आठ-दहा कढीलिंबाची पान

५)    एक चमचा लिंबाचा रस

६)      चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे

७)      मीठ , साखर , तीन मोठे चमचे तेल

८)     फोडणीसाठी मोहरी , हिंग , हळद .

कृती :-

१) फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पान , शेंगदाणे घालून परतून घ्यावे .

२) त्यावर कांदा घालून परतावा .  लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .

३) पोहे , मीठ , साखर घालून परतून गार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे .

४) पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव .

५) मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी .  दोन प्लेट पोहे होतात .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *