M4मराठी.com विशेष

aurangabad

  • बीड। दि. २७ (प्रतिनिधींकडून)
    शुक्रवारी पहाटे शिरूर तालुक्यातील राळेसांगवी येथे चोरट्यांनी एका व्यापार्‍याच्या घरातून नऊ लाख साठ हजार रुपयाची रोख रक्कम लांबवित पोलिसांना जोरदार हाबाडा दिला. गेवराई तालुक्यातील गढी येथे सिमेंटचे दुकान फोडले तर पाटोद्यात एक घर फोडले.बीड। दि. २७ (प्रतिनिधींकडून)
    शुक्रवारी पहाटे शिरूर तालुक्यातील राळेसांगवी येथे चोरट्यांनी एका व्यापार्‍याच्या घरातून नऊ लाख साठ हजार रुपयाची रोख रक्कम लांबवित पोलिसांना जोरदार हाबाडा दिला. गेवराई तालुक्यातील गढी येथे सिमेंटचे दुकान फोडले तर पाटोद्यात एक घर फोडले.
    शुक्रवारी राळेसांगवी येथील कापसाचे व्यापारी भीमराव शंकरराव खेडकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेली ९ लाख रुपयांची रोकड लांबविली. उकाड्यामुळे ते गच्चीवर झोपले होते. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ‘डॉन’ या श्‍वानाचे तपासपथक बोलावून माग काढण्याचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातील गढी येथील सिमेंटचे व्यापारी सीताराम गव्हाणे यांच्या दुकानातून चोरट्यांनी सिमेंट, फ्रीज व ऑईलच्या पुड्यासह ५0 हजार रुपयांचा माल चोरुन नेला तर पाटोदा येथील गोरख साहेबराव सानप हे गुरुवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दागिन्यासह १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
    राळेसांगवी येथे झालेल्या नऊ लाख ६0 हजाराच्या चोरी प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार चोरीचा आहे की बनवाबनवीचा याबाबतही चौकशी चालू आहे.शिरुर पोलिसांकडे गस्तीला वाहन नाही. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून गस्त बंद आहे.
  • जयप्रकाश दगडे। दि. २७ (लातूर )
    वीजचोरीसाठी एका दुग्धजन्य खाद्यपेये बनविणार्‍या कंपनीने वेगळीच शक्कल लढविली. महावितरणने वीज कनेक्शन न दिल्याने त्या कंपनीने थेट शेजार्‍याच्या बोअरवरील वीजजोडणीवरून चक्क १ किलोमिटर लांबीची भूमिगत केबल टाकून ५ किलोवॅटचा बेकायदेशीर वीजवापर केला. महावितरणच्या भरारी पथकाने ही वीजचोरी उजेडात आणली.जयप्रकाश दगडे। दि. २७ (लातूर )
    वीजचोरीसाठी एका दुग्धजन्य खाद्यपेये बनविणार्‍या कंपनीने वेगळीच शक्कल लढविली. महावितरणने वीज कनेक्शन न दिल्याने त्या कंपनीने थेट शेजार्‍याच्या बोअरवरील वीजजोडणीवरून चक्क १ किलोमिटर लांबीची भूमिगत केबल टाकून ५ किलोवॅटचा बेकायदेशीर वीजवापर केला. महावितरणच्या भरारी पथकाने ही वीजचोरी उजेडात आणली.
    काही अधिकार्‍यांच्या मेहेरनजरेमुळे या प्रकरणी बिलनिर्धारण व दंड कमी आकारण्यात आल्याचे पुढे आले. शेजार्‍यानेही महावितरणचे लाखाचे आर्थिक नुकसान केल्याचे भरारी पथकाने उघडकीस आणले आहे. महावितरणच्या लातूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने मे. समृध्द जीवन फुड्स इंडिया लि., पुणे या दूध प्रक्रिया करणार्‍या कंपनीची चलाखी उघडकीस आणली. जवळपास ३६ हजार रुपयांचा दंड व बिलनिर्धारण या प्रकरणी करण्यात आले आहे. तसेच तडजोड रक्कम म्हणून १0 हजार रुपयांचे बिल देऊन त्याची वसुली करण्यात आली. पुणे येथील महेश मोतेवार यांनी येणेगूर येथे भूखंड खरेदी करून दुधावर प्रक्रिया करून खाद्यपेय बनविण्याचा कारखाना टाकला आहे. कंपनीने कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळे त्यांना महावितरणने वीज कनेक्शन दिले नाही. त्यामुळे त्यांनी शेजारी असलेले बालाजी कलशेट्टी यांच्या बोअरवरील वीजजोडणीचा वीज चोरी साठी अवैध वापर केला. महावितरणच्या स्थानिक कर्मचार्‍याला हाताशी धरले आणि फोकसचे गोळे, दोन अश्‍वशक्ती पाणी मोटार, पाच संगणक, हिटर, शेगडीसाठी ५ किलोवॅट ओढून बेकायदेशीर वीजवापर केला. वीज वितरण कंपनीचे गेल्या दीड वर्षात २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच शेजार्‍यानेही ५0 हजार रुपयांची बोअरवरील कनेक्शन मीटर जाळून १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे भरारी पथकाच्या निर्दशनास आले. तथापि, फिरत्या पथकातील एका अधिकार्‍याचे हात ओले केल्यानंतर कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर ‘त्या’ अधिकार्‍याने मेहेरनजर ठेवून दंडाची कमी आकारणी केल्याची परिसरात चर्चा आहे.
  • शिवाजी डापके । दि.२७ (सिल्लोड)-
    राज्य ग्रामसेवक युनियनने कामाच्या सक्तीच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात मग्रारोहयोच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून २५ एप्रिल पासून हे आंदोलन सुरू झाले आहे.शिवाजी डापके । दि.२७ (सिल्लोड)-
    राज्य ग्रामसेवक युनियनने कामाच्या सक्तीच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात मग्रारोहयोच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून २५ एप्रिल पासून हे आंदोलन सुरू झाले आहे.
    रोहयो कामे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, आतापर्यंत झालेल्या रोहयो कामांचा निधी उपलब्ध करावा या प्रमुख मागण्यासांठी ग्रामसेवक युनियन दोन महिन्यांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असून याबाबत केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने बुधवारपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर बहिष्कार टाकण्यात आल्याने ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे बंद पडली आहेत.
    रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांना याप्रकरणी युनियनने २२ मार्च २0१२ रोजी निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. मग्रारोहयोची कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी, आजपर्यंत झालेल्या कामांचा निधी देण्यात यावा, २0 ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करावे, आदर्श ग्रामसेवकास ४ टक्के वेतनवाढ द्यावी, राज्यात सर्व पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकार्‍याचे पद निर्माण करावे, ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीस ग्रामविकास अधिकार्‍याच्या हाताखाली ग्रामसेवकाचे पद असावे आदी मागण्या ग्रामसेवक युनियनद्वारे रोहयोमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.
    ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एल.जी. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात २७ हजार ९२७ ग्रामपंचायती असून ग्रामसेवकांची संख्या मात्र २३ हजार ३0७ आहे.
    केंद्र व राज्य सरकारची कुठलीही योजना ग्रामपंचायतपासून सुरू होते, मात्र या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी यंत्रणा ग्रामपातळीवर देण्यात येत नाही. गेल्या १२ महिन्यांत राज्यभरात १५ ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली असून याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. १0 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीस ग्रामसेवक व एक किंवा दोन कर्मचारी असतात अनेकदा त्यांचे वेतन देण्यापुरता निधी उपलब्ध नसतो, मात्र एवढय़ाच लोकसंख्येच्या नगर परिषदांकडे ५0 ते १00 कर्मचारी असतात. ग्रामीण व शहरी भागांकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी युनियनचा आग्रह असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणात शासनाने लक्ष घातले नाही तर न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.
  • औरंगाबाद। दि. २७ (लोकमत ब्युरो)
    न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त समिती शिर्डी संस्थान संचलित दोन दवाखान्यांसाठी २0१२-१३ या वर्षाकरिता आवश्यक असलेली औषधी आणि वैद्यकीय साधने खरेदीकरिता निविदा मागवू शकेल; मात्र त्या निविदा अंतिम करण्यापूर्वी समितीने खंडपीठाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे न्या. ए.एस. ओक आणि न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.औरंगाबाद। दि. २७ (लोकमत ब्युरो)
    न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त समिती शिर्डी संस्थान संचलित दोन दवाखान्यांसाठी २0१२-१३ या वर्षाकरिता आवश्यक असलेली औषधी आणि वैद्यकीय साधने खरेदीकरिता निविदा मागवू शकेल; मात्र त्या निविदा अंतिम करण्यापूर्वी समितीने खंडपीठाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे न्या. ए.एस. ओक आणि न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
    तसेच काही ठराविक काळासाठी संस्थानला अन्नधान्य, तुप आदी वस्तू राज्य शासन पुरवू शकेल काय याची माहिती घेण्यासाठी सरकारी वकील एस.व्ही. कुरुंदकर यांनी वेळ देण्याची विनंती केली असता खंडपीठाने याचिकेवर ५ मे २0१२ रोजी सुनावणी ठेवली आहे.
    श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) तालुका राहाता यांनी खंडपीठात दाखल लोकहितवादी याचिकेत एक दिवानी अर्ज दाखल करून न्यायालयास विनंती केली होती की, संस्थानतर्फे अन्नदानासाठी यापूर्वी खरेदी करण्यात आलेले अन्नधान्य, तूप आदी साहित्य संपत आले आहे. नव्याने वरील साहित्य खरेदी करण्यासाठी ५५ कोटीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच संस्थानतर्फे चालविण्यात येणार्‍या दोन दवाखान्यांसाठी आवश्यक असलेली औषधी आणि वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी ४0 कोटींच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती समितीतर्फे करण्यात आली होती. त्या संदर्भात खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे काही ठराविक काळासाठी संस्थानला अन्न धान्य, तूप आदी वस्तू राज्य शासन पुरवू शकेल काय याची माहिती घेण्यासाठी सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतला. याच सोबत राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनीसुद्धा वरील लोकहितवादी याचिकेत वेगळा दिवाणी अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने नेमलेल्या तात्पुरत्या त्रिसदस्यीय समितीमध्ये अहमदनगरचे पोलिस अधीक्षक यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्याची विनंती केली आहे. या दोन्ही दिवाणी अर्जांवर ५ मे २0१२ रोजी सुनावणी होणार आहे.
    या प्रकरणात शिर्डी संस्थानतर्फे अँड. आर.एन. धोर्डे, शासनातर्फे सरकारी वकील एस.व्ही. कुरुंदकर, मुळ याचिकाकर्ते गोंदकर आणि कुलकर्णी यांच्यातर्फे अँड. प्रदीप पाटील यांच्याकरिता अँड. सतीश बी. तळेकर आणि अँड. किरण नगरकर हे काम पाहत आहेत.
  • रामेश्‍वर काकडे। दि. २७ (नांदेड)
    विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत मार्च २0१२ अखेर सिंगलफेज योजनेची कामे २२0९ गावांत पूर्ण केली आहेत.
    ग्रामीण भागातील वाढलेल्या भारनियमनापासून वीजग्राहकांना दिलासा मिळावा, तसेच गावात दिवाबत्ती व पाण्याची सोय व्हावी, यासाठी सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागात कृषीपंपासाठी १३ ते १६ तास भारनियमन केले जाते. दरम्यानच्या वेळेमध्ये ग्रामस्थांना अंधाराचा सामना करवा लागणार नाही, यासाठी ज्यावेळेस थ्रीफेजचे भारनियमन सुरू असते अशा वेळेत सिंगलफेजचा वीजपुरवठा सुरळीत केला जातो.रामेश्‍वर काकडे। दि. २७ (नांदेड)
    विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत मार्च २0१२ अखेर सिंगलफेज योजनेची कामे २२0९ गावांत पूर्ण केली आहेत.
    ग्रामीण भागातील वाढलेल्या भारनियमनापासून वीजग्राहकांना दिलासा मिळावा, तसेच गावात दिवाबत्ती व पाण्याची सोय व्हावी, यासाठी सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागात कृषीपंपासाठी १३ ते १६ तास भारनियमन केले जाते. दरम्यानच्या वेळेमध्ये ग्रामस्थांना अंधाराचा सामना करवा लागणार नाही, यासाठी ज्यावेळेस थ्रीफेजचे भारनियमन सुरू असते अशा वेळेत सिंगलफेजचा वीजपुरवठा सुरळीत केला जातो.
    महावितरणच्या नांदेड परिमंडळाअंतर्गत सिंगलफेज योजनेची विविध टप्प्यात कामे करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्हा ९९४, परभणी ३३७ व हिंगोली ६६ अशा एकूण १३९७ गावांत सिंगलफेज योजनेची कामे करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात नांदेड जिल्हा ३३३, परभणी १४२ व हिंगोली ७0 अशी ५४५ गावे वाडी-तांड्यात तर तिसर्‍या टप्प्यात नांदेड १७३, परभणी ४0, हिंगोली ५४ याप्रमाणे नांदेड जिल्ह्य़ात १५00 गावे वाडी-तांड्यात, परभणी- ५१९ तर हिंगोली जिल्ह्य़ात १९0 अशा एकूण २२0९ गावांत सिंगलफेजची कामे पूर्ण झाली आहेत. चौथ्या टप्प्यात नांदेड ३३२, परभणी १३४ तर हिंगोली ७0 याप्रमाणे एकूण ५३६ गावांत सिंगलफेजची कामे प्रस्तावित आहेत. यामुळे उर्वरित गावे, वाडी-तांड्यातही लवकरच दिवाबत्तीची सोय होणार आहे. सिंगलफेजचा विद्युतप्रवाह आवश्यक त्या वेळी सुरू राहत असल्यामुळे ग्रामीण भागातील वीजग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे.
  • हिंगोली। दि. २७ (प्रतिनिधी)
    गायनाचा कार्यक्रम सादर करतेवेळी माईकमध्ये वीज उतरून बसलेल्या धक्यामुळे गायकाचा मृत्यू झाला. पारडी सावळी येथे गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.हिंगोली। दि. २७ (प्रतिनिधी)
    गायनाचा कार्यक्रम सादर करतेवेळी माईकमध्ये वीज उतरून बसलेल्या धक्यामुळे गायकाचा मृत्यू झाला. पारडी सावळी येथे गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
    औंढा नागनाथ तालुक्यातील पारडी सावळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियोजनानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जुनुना येथील गायक जयवंत शिवराम सपाटे गीत सादर करीत होते. कार्यक्रम रंगात असताना रात्री ११.३0 वाजण्याच्या सुमारास अचानक माईकमध्ये वीज उतरून गायकास विजेचा जोराचा धक्का बसला. विजेच्या तीव्र धक्यामुळे गायक गंभीररित्या भाजल्याने व्यासपीठावरच कोसळला. त्यावेळी तात्काळ त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. सतीष वाकळे यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद जयवंत सखाराम सपाटे यांनी दिल्यानंतर औंढा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
  • नांदेड। दि. २७ (प्रतिनिधी)
    o्री हुजूर साहिब रेल्वेस्थानक यार्डात रेल्वे इंजीन रुळावरून घसरले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सदर इंजीन पूर्ववत रुळावर आणण्यास तब्बल दोन तास लागले.नांदेड। दि. २७ (प्रतिनिधी)
    o्री हुजूर साहिब रेल्वेस्थानक यार्डात रेल्वे इंजीन रुळावरून घसरले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सदर इंजीन पूर्ववत रुळावर आणण्यास तब्बल दोन तास लागले.
    इंजीन क्रमांक १८८९४ रेल्वे यार्डात शंटींग करत होते. रुळ बदलत असताना अचानक तीन चाके रुळावरून घसरली. इंजीन रुळावर आणण्यासाठी पूर्णा येथून क्रेन मागविण्यात आली.दुर्घटना निवारण रेल्वेगाडी व १४0 टी ब्रेकडाऊन १४४0१२ क्रेन नांदेड स्थानकात दाखल झाली.,परंतु सदर क्रेन येइपर्यंत रेल्वेस्थानकातील गँगमन व यांत्रिकी विभागाच्या कर्मचार्‍यांनी तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमाने सदर दुर्घटनाग्रस्त इंजिन पटरीवर आणण्यात यश मिळविले. सदर कार्यात यांत्रिकी विभागातील २0 अधिकारी व कर्मचारी व इतर विभागातील १५ जणांनी सहभाग घेतला. इंजिन रुळावरून घसरल्याने इतर गाड्यांच्या दुरूस्तीवर परिणाम झाला.
    इंजिन घसरल्या प्रकरणाची चौकशी- एस. एस.सोईन
    नांदेड स्थानकातील रेल्वेयार्डात शंटींग करताना इंजीन घसरले. घटनेची चौकशी रेल्वे वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती द.म. रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस.एस. सोईन यांनी दिली.
  • लातूर। दि. २७ (प्रतिनिधी)
    बनावट नोटा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक पथक परराज्यात दुसरे पथक उदगीर आणि लातूर शहरात शोध घेणार आहे.लातूर। दि. २७ (प्रतिनिधी)
    बनावट नोटा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक पथक परराज्यात दुसरे पथक उदगीर आणि लातूर शहरात शोध घेणार आहे.
    ४0 हजार रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी उदगीरच्या दोन आरोपींना गुरुवारी गजाआड केले आहे. एक पथक शनिवारी परराज्यात रवाना होणार आहे.
    सपोनि. प्रदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली पथक लातूर व उदगीर शहरात तळ ठोकेल. दरम्यान, गुरुवारी पकडण्यात आलेल्या अब्दुल हक्क खाजा सय्यद व शेख अराफत गौस पाशा या आरोपींची पोलिस कसोशीने चौकशी करीत आहेत. १ मेपर्यंत त्यांना पोलिस कस्टडी आहे. या आरोपींकडून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
  • कमलाकर जोशी। दि. २७ (नांदेड)
    मागासक्षेत्र अनुदान निधीअंतर्गत राज्यातील गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करून व्हीजन डॉक्युमेंट योजना राबविण्यात येत असूनत्यासाठी राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात मराठवाड्यातील तीन जिल्हे आहेत.कमलाकर जोशी। दि. २७ (नांदेड)
    मागासक्षेत्र अनुदान निधीअंतर्गत राज्यातील गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करून व्हीजन डॉक्युमेंट योजना राबविण्यात येत असूनत्यासाठी राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात मराठवाड्यातील तीन जिल्हे आहेत.
    केंद्र शासनाची ही योजना महाराष्ट्रात ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. योजनेच्या उच्चस्तरीय समितीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. या योजनेअंतर्गत सन २0१२ ते १७ या कालावधीत जिल्हा नियोजित विकास आराखडा तसेच सन २0१२ पासूनचे जिल्हा वार्षिक आराखडे सूक्ष्म नियोजन पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार व यवतमाळ या जिल्ह्यांचा योजनेत समावेश आहे.
    प्रत्येक जिल्हा पुढील १0 ते १५ वर्षांच्या कालावधीचे एक ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करणार आहे. अशाप्रकारचा जिल्हा आराखडा बनविण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेवर टाकण्यात आली आहे. गावपातळीवरच्या या सूक्ष्म नियोजनामुळे गावातील प्रश्न, समस्या आणि पायाभूत सुविधांबाबतचे नियोजन केले जाणार आहे. या योजनेतील ९५ टक्के निधी पंचायत समित्यांना आणि ५ लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या नागरी स्वराज्य संस्थांना विकासकामासाठी देण्यात येणार आहे. तर ५ टक्के निधी प्रशासकीय, माहिती व्यवस्थापन, आधुनिकीकरण यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
    या योजनेबाबत नांदेड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे संपर्क साधला असता शाखा अभियंता फड म्हणाले, या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५३ लाख रुपये मिळाले. दुसर्‍या टप्प्यात २६ कोटी ३९ लाख रुपये देण्यात आले आहेत. आता २0१२-१३ या वर्षाचा प्रस्ताव ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभा घेवून पाठविण्यात येत असून नगरपालिका क्षेत्रातही असा प्रस्ताव पाठवावा, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा चालू आहे.
  • नांदेड। दि.२७ (प्रतिनिधी)
    राज्यात ३४ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असणार्‍या महावितरणच्या नांदेडसह ४४ विभागांमध्ये भारनियमन सुरूच आहे. एकूणच वीजचोरी व गळती नियंत्रणात नाही आल्यास उलट फिडरनिहाय भारनियमन वाढणार आहे. सध्या नांदेड शहरात वीजगळती ५१ टक्के असून ती आणखी १७ टक्के कमी केली तरच भारनियमनमुक्ती मिळेल.नांदेड। दि.२७ (प्रतिनिधी)
    राज्यात ३४ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असणार्‍या महावितरणच्या नांदेडसह ४४ विभागांमध्ये भारनियमन सुरूच आहे. एकूणच वीजचोरी व गळती नियंत्रणात नाही आल्यास उलट फिडरनिहाय भारनियमन वाढणार आहे. सध्या नांदेड शहरात वीजगळती ५१ टक्के असून ती आणखी १७ टक्के कमी केली तरच भारनियमनमुक्ती मिळेल.
    राज्यातील महावितरणच्या एकूण १४२ विभागांपैकी ए, बी व सी गटातील ९८ विभाग भारनियमनमुक्त झाले आहेत. एकूण वीजहानी 0 ते १८ टक्के असेल तर ए गट मिळतो. १८ ते २६ टक्के- बी गट तसेच २६ ते ३४ टक्के हानी सी गटात येते. याच तीन गटांना भारनियमनमुक्तीचा लाभ मिळाला आहे. राज्यातील ४४ विभाग अद्यापही डी, ई व एफ गटात असल्याने तेथे साडेपाच ते सात तास भारनियमन सुरू आहे. त्यातही ५५ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असणार्‍या विभागात फिडरनिहायआढावा घेतला जात आहे. जितकी वीजहानी अथवा चोरी जास्त तितके भारनियमन अधिक हे सूत्र लावण्यात येत आहे.
    मराठवाड्यात वीजहानी कमी असलेले एकमेव लातूर शहर सी गटात मोडते. त्यामुळे तेथे भारनियमन होणार नाही. तर औरंगाबाद शहर खासगी कंपनीकडे आहे. मात्र औरंगाबाद ग्रामीण, जालना-१, जालना-२, नांदेड शहर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड येथे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी आहे. त्यात जालना क्रमांक एकवर तर नांदेड शहर दुसर्‍या स्थानी आहे. विशेष म्हणजे, नांदेड ग्रामीणची स्थिती शहरापेक्षा उत्तम आहे.
  • रामदास पटेकर। दि. २७ (सुखापुरी)
    अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील अनेक लहान मोठे तलाव कोरडेठाक पडल्याने मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. सुखापुरी तलावात यंदा बोटुकली जातीचे एक लाख, फराई जातीचे दोन लाख बिस्कॉन जातीचे १ लाख, शासनाकडून झिंगा जातीचे ९0 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले होते. पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय मंदावला आहे.रामदास पटेकर। दि. २७ (सुखापुरी)
    अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरातील अनेक लहान मोठे तलाव कोरडेठाक पडल्याने मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. सुखापुरी तलावात यंदा बोटुकली जातीचे एक लाख, फराई जातीचे दोन लाख बिस्कॉन जातीचे १ लाख, शासनाकडून झिंगा जातीचे ९0 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले होते. पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय मंदावला आहे.
    दरवर्षी पावसाळ्यात तलावात मोठय़ा प्रमाणात मत्स्यबीज सोडले जातात. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षाही कमी असल्याने बीज सोडूनही उपयोग झाला नाही. पाणीसाठा नसल्याने माशांची पैदास झाली नसल्याचे गल्हाटी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद कचरे यांनी सांगितले. परिसरात ३00 ते ४00 जण मासेमारीचा व्यवसाय करतात. आता तलाव कोरडीठाक पडल्याने अनेकांनी दुसरा रोजगार सुरू केल्याचे कचरे यांचे म्हणणे आहे.


  • Copyright 2011-12 m4marathi.com