इचलकरंजी। दि. 26 (वार्ताहर)
आईला विनाकारण शिवीगाळ आणि मारहाण करणार्या वडिलांचा तारदाळ (ता. हातकणंगले) येथील तरुणाने खून केला. याबाबतचा गुन्हा आज रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाला. अनिल तुकाराम पोवार (वय 47) असे मृताचे नाव असून, संशयित विकास (22) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.इचलकरंजी। दि. 26 (वार्ताहर)
आईला विनाकारण शिवीगाळ आणि मारहाण करणार्या वडिलांचा तारदाळ (ता. हातकणंगले) येथील तरुणाने खून केला. याबाबतचा गुन्हा आज रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाला. अनिल तुकाराम पोवार (वय 47) असे मृताचे नाव असून, संशयित विकास (22) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी र् तारदाळ येथील कोले गल्लीत अनिल तुकाराम पोवार पत्नी आणि मुलांसह राहत होते. अनिल पोवार वारंवार आपल्या पत्नीला विनाकारण मारहाण व शिवीगाळ करीत होते. बुधवारी रात्री पुन्हा असा प्रकार घडल्याने मुलगा विकास याचा वडिलांशी वाद झाला. यातूनच रागाच्या भरात विकासने वडील अनिल पोवार यांच्या डोक्यात यंत्रमागाच्या बॅटन पट्टीने जोरदार घाव घातला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने खाली कोसळलेल्या वडिलांना त्याने तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचार सुरू असताना आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मुलगा विकास पोवार याच्याविरोधात वडिलांच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबतची फिर्याद रवींद्र तुकाराम पोवार (50) यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव करीत आहेत.
धडकी भरवणार्या विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली. कोणत्याही भागात गेले तरी रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. अचानक आलेल्या या पावसाने सायंकाळी घरी परतणार्यांची तारांबळ उडवली.विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह तासभर जोरदार पाऊस
कोल्हापूर । दि. २६ (प्रतिनिधी)
धडकी भरवणार्या विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली. कोणत्याही भागात गेले तरी रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. अचानक आलेल्या या पावसाने सायंकाळी घरी परतणार्यांची तारांबळ उडवली.
सायंकाळी पाचपासूनच पावसाची चाहूल लागली. धुळीचे लोट हवेत घिरट्या घालत होते. सव्वासहाच्या सुमारास हलक्या सरींसह पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि क्षणात चमकून जाणार्या विजांनी छातीत धस्स होत होते. बघता-बघता पावसाने जोर धरला. तब्बल तासभर टपोर्या थेंबांनी झोडपले. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्ते प्रकल्पातील गटर्सची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. गटर्समधील घाणेरडे पाणी रस्त्यावर पसरल्याने त्याची दुर्गंधी सुटली होती. फळे-भाजीपाला विक्रेते, फिरते विक्रेते यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. पावसात अडकलेल्या लोकांना घरी जाण्यासाठी रिक्षा हवी होती; परंतु, ती मिळत नव्हती. या पावसाने तासाभरात वातावरण गार झाले.
कोल्हापूर, दि. 26 (प्रतिनिधी) र् शाळकरी मुलाचा पंचगंगा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयुर संजय यादव (वय 14, रा. मातंग वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. राजाराम बंधारा येथे दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. सामाजिक कार्यकर्ता दिनकर कांबळे यांनी अथक परिश्रमानंतर मयुरचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. शाहुपूरी पोलीसात घटनेची नोंद झाली आहे.कोल्हापूर, दि. 26 (प्रतिनिधी) र् शाळकरी मुलाचा पंचगंगा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयुर संजय यादव (वय 14, रा. मातंग वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. राजाराम बंधारा येथे दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. सामाजिक कार्यकर्ता दिनकर कांबळे यांनी अथक परिश्रमानंतर मयुरचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. शाहुपूरी पोलीसात घटनेची नोंद झाली आहे.
मयुर आज दुपारी बाराच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पोहायला गेला होता. त्यावेळी नदीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सायंकाळर्पयत मयुर घरी परत न आल्याने कुटुंबिय त्याचा शोध घेऊ लागले. राजाराम बंधार्र्याजवळ त्याची सायकल व कपडे होते. मयुर नदीत बुडाला असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान व सामाजिक कार्यकर्ता दिनकर कांबळे यांना बोलविण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे यांनी मयुरचा मृतदेह नदीतील पाण्यातून बाहेर काढला.
कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
धडकी भरवणार्या विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने तासभर झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली, तर कोणत्याही भागात गेले तर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. सायंकाळी नोकरीवरून घरी परतणार्यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. तर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हॉटेल शिवतारा येथे वादळी वार्याने आणि मुसळधार पावसामुळे झाड पडल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
धडकी भरवणार्या विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने तासभर झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली, तर कोणत्याही भागात गेले तर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. सायंकाळी नोकरीवरून घरी परतणार्यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. तर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हॉटेल शिवतारा येथे वादळी वार्याने आणि मुसळधार पावसामुळे झाड पडल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
आज पाच वाजल्यापासूनच पावसाची चाहूल लागली होती. धुळीचे लोट हवेत घिरटय़ा घालत होते. सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हलकी सर आली आणि पाऊस सुरू झाला. पाठोपाठ विजांचा कडकडाट सुरू झाला. बघता-बघता पावसाने जोर धरला. तब्बल तासभर टपोर्या थेंबाचा पाऊस पडत होता. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्ते प्रकल्पातील गटर्सची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. फळे-भाजापीला विक्रेते, फिरते विक्रेते यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. पावसात अडकलेल्या लोकांना घरी जाण्यासाठी रिक्षा हवी होती; परंतु ती मिळत नव्हती. कदमवाडी भागात मशिदीजवळ, टेंबलाईवाडी परिसरात झाड पडले. सदर बझार परिसरात वायरिंग जळाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
वृक्ष कोसळलीत..
मुसळधार पावसामूळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामूळे सर्वत्र काळोख्याचे साम्रज्या पसरले होते. त्याचबरोबर शिवाजी पार्क येथील प्रिन्स कॉलनी, शिवाजी पेठेतील न्यु कॉलेजच्या पिछाडिस असणार्या फिरंगाई कमानीजवळ तसेच अन्य भागातही झाडे पडली होती. रात्रीर्पयत ही झाडे हालवण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान करत होते.
कोल्हापूर-सांगली वाहतूक ठप्प
आज (गुरुवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस व वादळी वार्याने शिरोली परिसराला झोडपून काढले. यात सोसाटय़ाच्या वार्यात कोल्हापूर-सांगली रस्त्यावर जैन मंदिर, हॉटेल कैलास, हॉटेल शिवतारा येथे जागो-जागी
वृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी वाहने व सांगलीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहने पेठवडगाव मार्गे वळवण्यात आली,
कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्या प्रशासकाबाबत काय निर्णय घ्यायचा यासंबंधीचा अभिप्राय शासनाकडून मागवण्यात येणार आहे. विद्यमान प्रशासक डॉ.सुधीरकुमार गोयल व सुधीर श्रीवास्तव यांनी आपल्याला मुदतवाढ देवू नये असे पत्र शासनाला दिले असल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असा अभिप्राय मागवण्यात येणार आहे.कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्या प्रशासकाबाबत काय निर्णय घ्यायचा यासंबंधीचा अभिप्राय शासनाकडून मागवण्यात येणार आहे. विद्यमान प्रशासक डॉ.सुधीरकुमार गोयल व सुधीर श्रीवास्तव यांनी आपल्याला मुदतवाढ देवू नये असे पत्र शासनाला दिले असल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असा अभिप्राय मागवण्यात येणार आहे.
प्रशासकपदाची मुदत पाच वर्षार्पयतही असू शकते. संबंधित संस्था अडचणीतून बाहेर आल्याची शासनाची खात्री झाल्यानंतर तिथे प्रशासकानेच निवडणूक घेवून ती संस्था लोकनियुक्त संचालकमंडळाकडे सोपविण्याची पध्दत आहे.
राज्य बँकेची आर्थिक स्थिती सुधारली असली तरी या बँकेची निवडणूक कधी होणार हे अद्याप अनिश्चित आहे. कारण बँकेच्या व्यवहाराशी संबंधित 11 मुद्दय़ांबाबत नाबार्डचा अहवाल आल्याशिवाय त्यासंबंधीचा निर्णय होवू शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया होईर्पयत तेच प्रशासक मंडळ राहू शकते. परंतू गोयल व श्रीवास्तव यांची आपल्या मुळ विभागांचा कामाचा व्याप जास्त असल्याने प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे असे पत्र शासनाला पाठविले आहे.
सहा मे रोजी त्यांना प्रशासक म्हणून एक वर्ष होत आहे. त्यामुळे गोयल व श्रीवास्तव यांना प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त करायचे का व तसे केल्यास ही जबाबदारी कुणाकडे दिली जावी यासंबंधीचा अभिप्राय सहकार विभाग सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे मागवणार आहे. त्यांच्याकडून मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याशी चर्चा होवून त्याचा निर्णय होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे काय म्हणतात यावरच त्यासंबंधीचा निर्णय अवलंबून असेल.
दरम्यान श्री.गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मला याविषयावर वृत्तपत्रांशी बोलायचे नाही असे सांगितले. सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ मुदतवाढ दिली जावू नये असे श्री.गोयल यांचे पत्र शासनाला मिळाले आहे.
सहा महिन्यापूर्वीच त्यांनी ही विनंती केली होती. शासनाशी चर्चा करून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल.
बँकींग क्षेत्रातील कामाचा अनुभव व व्यावसायिक दृष्टीकोन असणार्या अधिकार्यास अशी संधी दिली जावू शकते.’’