अरुण बारसकर। दि. 27 (सोलापूर)
एमआरईजीएसच्या नव्या विहिरींच्या मंजुरीला जिल्हाधिका:यांनी ब्रेक लावला आहे. विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता नियमांची कसरत करावी लागणार असल्याने योजना आपोआप बंद होणार आहे.
5 मार्च 2011 रोजी राज्य शासनाने अल्पभूधारक शेतक:यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आदेश काढला होता.
पहिल्या वर्षी 16 हजार 957 विहिरींच्या कामांना जिल्हाधिका:यांनी मंजुरी दिली होती. त्यापैकी 6,450 विहिरींची कामे सुरू झाली व 3,949 विहिरी मार्चअखेर पूर्ण झाल्या आहेत. 2,511 विहिरींची कामे अद्याप अपूर्ण असून, त्यापैकी काही विहिरींची कामे सुरू असून काहींची कामे बंद आहेत.
पाच एकरावरील शेतक:यांसाठी ही योजना अतिशय फायद्याची ठरली आहे. गरीब व गरजू शेतक:यांची कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी योजना वर्षभरात गुंडाळली आहे.
आता ही योजना केवळ दारिद्रय़रेषेखालील व मागासवर्गीय शेतक:यांसाठी राबविली जाणार आहे. ज्यांच्याकडे जमीन व जागा नाही, ज्यांची आर्थिक स्थिती गरिबीची आहे अशांचीच नावे दारिद्रय़रेषेच्या यादीत असावीत, असा नियम असताना जिल्हाधिका:यांनी दारिद्रय़रेषेखालील शेतक:यांना विहिरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर। दि. 27 (प्रतिनिधी)
एस्कॉर्ट मक्तेदाराकडून मालट्रक चालकांकडून अवाजवी रक्कम वसूल केली जात असल्याच्या नगरसेवक दीपक राजगे यांच्या तक्रार अर्जावरून मक्तेदाराला नोटीस काढून खतरजमा केली जाईल. 160 रुपयांपेक्षा अधिक वसुली केली जाऊ नये म्हणून पावतीवर रकमेचा शिक्का मारला जाईल, अशी माहिती सहा. आयुक्त पी. वाय. बिराजदार यांनी दिली.
पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मनपामध्ये घेतलेल्या बैठकीपासून महापालिका प्रशासन झाडून कामाला लागले आहे. मनपाच्या प्रत्येक विभागात काहीना काही हालचाल सुरू झाली आहे. मनपा प्रशासन विभागापाठोपाठ महसूल विभागाने नोटिसांचा पाऊस सुरू केला आहे. त्याचे पडसादही उमटू लागले आहेत.
एस्कॉर्ट मक्तेदाराविषयी अधिक रक्कम घेतली जात असल्याची गंभीर तक्रार आहे. मनपाने मक्तेदारास पुरविलेल्या पावतीचा नमुना जुना आहे. परंतु मक्तेदाराच्या कार्यसंस्कृतीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने 148 व नोंदणी अर्जाचे 12 रुपये असे मिळून 160 रुपयांचा उल्लेख पावतीवर केला जाईल. याशिवाय प्रत्येक नाक्यावर दर्शनी भागात ठळकपणे 160 रुपयांपेक्षा अधिक मागणी केल्यास मनपा आयुक्तालयात संबंधित फोनवर तक्रार करावी, असा फलक लावणे बंधनकारक केले जाईल, असे बिराजदार यांनी सांगितले.
एस्कॉर्ट मक्तेदाराने दररोज 10 लाख 18 हजार रुपये मनपाच्या संयुक्त बँक खात्यात जमा करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात 8 ते 9 लाखांर्पयत रकमा जमा केल्या जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. एस्कॉर्ट मक्तेदाराकडून करारापेक्षा कमी रक्कम स्वीकारून मनपाचे आर्थिक नुकसान झाल्यास मनपा महसूल प्रशासन जबाबदार राहील, असे नगरसेवक दीपक राजगे यांनी सांगितले.
बँक गॅरंटीमधून दंड वसुलीची कार्यवाही
एस्कॉर्ट मक्तेदाराने 23 एप्रिलर्पयत 18.80 लाख रुपये कमी भरले आहेत. त्यामुळे बँक गॅरंटी म्हणून दिलेल्या रकमेतून कपात करण्याचे प्रकरण मनपा आयुक्तस्तरावर चालू आहे. पहिल्या व दुस:या आठवडय़ात रकमा कमी भरल्याने दंड भरण्याबाबतची नोटीस दिली असल्याची मनपा आयातकर अधीक्षक सी. के. पाणीभाते यांनी दिली.
सोलापूर। दि. 27 (प्रतिनिधी)
महापालिकेच्या विशेष समित्यांमधील कार्यबल असलेल्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नीला खांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विराजमान झाल्या. निवडणूक बिनविरोध असली तरीही कायदेशीर प्रक्रिया असताना काही सदस्य निवडणूक कार्यक्रमास अनुपस्थित होते.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवार व शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका नीला आनंद खांडेकर, मंडय़ा नि उद्यान समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनीता दादाराव रोटे व कामगार व समाजकल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या शैलजा प्रेमसिंग राठोड यांची बिनविरोध निवड झाली.
काँग्रेस, राष्ट्रवादी व युतीमध्ये विशेष समित्यांसाठी समझोता झाल्याने कोणत्याच समितीसाठी निवडणूक झाली नाही. परंतु मनपा कायद्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविणे बंधनकारक असल्याने जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना गुरुवारी सकाळी 11 ते 2.20 व शुक्रवारी 11 ते 1.20 र्पयतचा वेळ द्यावा लागला. या सात विशेष समित्यांवर 63 सदस्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यापैकी 14 सदस्य निवडणुकीस गैरहजर होते.
महिला व बालकल्याण आणि स्थापत्य समिती वगळता इतर समित्यांची बैठकही होत नाही, असे सांगितले जाते. निवडणुकीच्या सभेलाच नगरसेवकांनी गैरहजेरी लावली.
अनुपस्थित सदस्य
स्थापत्य समिती : शिवानंद पाटील, मंगल वानकऱ वैद्यकीय समिती : कुमूद अंकाराम, कल्पना कारभारी, महादेवी अलकुंट़े विधी समिती : सरस्वती कासलोलकऱ शहर सुधारणा समिती : फिरदोस पटेल, सुनीता भोसल़े मंडय़ा व उद्यान समिती : इस्माईल शेख, कल्पना यादव़ कामगार कल्याण समिती : विजया वड्डेपल्ली, आनंद चंदनशिव़े महिला समिती : परवीन इनामदार, उषा शिंद़े
शहाजहान शेख। दि. 27 (सोलापूर)
ऑल इंडिया इंजिनियरिंग एन्ट्रन्स एक्झामला (एआयईईई) पुणे येथे जाण्यासाठी अनेक रेल्वे गाडय़ांचे आरक्षण फुल्ल असल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर होता. मात्र सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने या विद्याथ्र्याना मदतीचा हात देत शनिवारी इंटरसिटी व सिध्देश्वरला प्रत्येकी एक डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवार, दि. 29 एप्रिल रोजी पुणे येथे एआयईईईसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून जाणा:या एक हजार विद्यार्थी व त्यांच्या पालकांची गैरसोय दूर होणार आहे.
‘एआयईईई’ परीक्षेस आपल्या पाल्याला पुणे येथे पाठविण्यासाठी पालक जेव्हा रेल्वेचे आरक्षित तिकिट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना आरक्षण नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हुतात्मा इंटरसिटीसाठी प्रतीक्षा यादीतील तिकीट उपलब्ध नसल्याने या पालकांनी ‘लोकमत’शी याबाबत संपर्क साधला. प्रस्तुत प्रतिनिधीने रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता आरक्षण शिल्लक नसल्याचा दुजोरा मिळाला. त्यानंतर सोलापुरातून निघणा:या रेल्वे गाडय़ांसाठी अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी जोर धरू लागली.
‘एआयईईई’ ची ऑफलाईन परीक्षा रविवारी सकाळी 9.30 वाजता होणार आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावर आठ वाजता उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे पुण्याबाहेरील विद्याथ्र्याना एक दिवस आधी म्हणजे शनिवारीच पुणे येथे पोहोचावे लागणार आहे. जास्तीत जास्त परीक्षार्थी हे आपल्या पालकांसह रेल्वेने पुणे येथे जाणार असल्याने त्यांनी सिध्देश्वर, इंद्रायणी, इंटरसिटी व पॅसेंजर गाडय़ांचे आरक्षण तिकीट काढलेले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून रेल्वे तिकिटाचे आरक्षण केलेले आहे. परीक्षेचा कालावधी जसजसा जवळ येऊ लागला तसतसे रेल्वे गाडय़ांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादी वाढू लागली व पालकांसह विद्याथ्र्याच्या हृदयाची धडकन वाढू लागली. विशेष म्हणजे शनिवार, दि. 28 रोजीची सिध्देश्वर एक्स्प्रेसला 508/303 व रविवार दि. 29 रोजीची 508/274 अशी मोठी प्रतीक्षा यादी होती. इंद्रायणी एक्स्प्रेला 28 रोजीची 463/348 व 29 रोजीची 256/163 प्रतीक्षा यादी होती. हुतात्मा एक्स्प्रेसला अनेक दिवसांपासून हाऊसफुल्ल आहे. या गाडीचे कोणतेही तिकीट उपलब्ध नाही. गोरगरिबांची व सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखल्या जाणा:या सोलापूर-पुणे पॅसेंजर एक्स्प्रसलाही कधी नव्हे तेवढी म्हणजे 77/59 एवढी प्रतीक्षा यादी आहे. या गाडीला केवळ एकच डबा आरक्षित आहे. हुतात्मा एक्स्प्रेस 14 डब्यांची असून, एका डब्यामध्ये 108 सीट क्षमता आहे. सिध्देश्वर एक्स्प्रेस 18 डब्यांची असून एका डब्यात 74 सीट क्षमता आहे. इंद्रायणी एक्स्प्रेस 17 डब्यांची असून, एका डब्यामध्ये 108 सीट क्षमता आहे.
परीक्षार्थी व त्यांचे पालक यांना शनिवारी पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हर्षद मोरे यांनी केली होती. यासाठी त्यांनी मुंबईसह सोलापूर येथील अधिका:यांकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे तात्पुरता का
होईना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे. ज्यांचे आरक्षण कन्फ्र्म झाले नाही, त्यांना रेल्वे प्रशासनाने कायद्याच्या कचाटय़ात पकडू नये अशी अपेक्षा पालकांची आहे.
पुणे येथे एआयईईई परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थी व पालक कोणत्या गाडीला आरक्षण केले, आरक्षणाची प्रतीक्षा यादी कशी आहे, हे पाहून सिद्धेश्वर व हुतात्मा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक बोगी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तांत्रिक बाबींमुळे काही गाडय़ांचे डबे वाढविता आले नाही. मात्र एकाच गाडीला गर्दी करण्यापेक्षा अन्य उपलब्ध गाडय़ांमधून प्रवास करणे सोयीचे होईल.
- सुशील गायकवाड
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
कामाच्या तणावाला कंटाळून मानेगाव (ता. माढा) येथील वीज केंद्रात नेमणुकीस असलेल्या वायरमनने गुरुवारी सायंकाळी नान्नज शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रभाकर पांडुरंग जाधव (वय 40, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या वायरमनचे नाव आहे. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमाराला हणमंत कोरे यांच्या शेतातील वाळलेल्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बाब निदर्शनाला आल्यावर सोलापूर तालुका पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे हलविले. त्यावेळी खिशात चिठ्ठी आढळली. मी वीज कंपनीत नोकरी करतो, कामाबाबत सांगू शकत नाही पण माङया मृत्यूस कोणास जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याने पोलीस बुचकाळ्यात पडले आहेत.
‘एलबीटी’ अधिनियमानुसार व्यापारी-उद्योजकांना नोटिसा दिल्या आहेत. कोणाची बदनामी हा त्यामागील महापालिकेचा उद्देश नाही. कर संकलनासाठी सुनावणी ठेवण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार सुनावणीच्या नोटिसा दिल्या आहेत. यापूर्वी ज्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले त्यांनी एलबीटी न भरल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त अजित जाधव यांनी दिला आहे.
महापालिकेने 11 उद्योजकांना विवरणपत्र न दाखल केल्याबद्दल नोटिसा दिल्याप्रकरणी व्यापा:यांनी संताप व्यक्त केल्याप्रकरणी अजित जाधव बोलत होते. यावेळी सहा.आयुक्त पी.वाय.बिराजदार उपस्थित होते.
व्यापा:यांना नोटिसा दिल्याने त्यांची बदनामी झाली, असे म्हणून दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे. ज्यांच्या व्यवसायाची कार्यालये शहरात आहेत, ज्यांचा शहरातून सर्व आर्थिक व्यवहार चालतो, त्यांनी मालाची शहरात आयात केली नाही, ही त्यांची बाजू असेल. परंतु सुनावणीस येऊन त्यांनी मांडावी. नोटीस म्हणजे त्यांना बाजू मांडण्याची संधी आहे, कारवाई नव्हे, असे जाधव म्हणाले.
शासनस्तरावर झालेल्या चर्चेच्या आधारावर मनपाने व्यापा:यांवरील खटले मागे घेतले. त्यापैकी केवळ 43 जणांनी एलबीटी भरला. उर्वरित 85 जणांनी एलबीटी भरलेलाच नाही. कायद्यामध्ये दंड व शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही नोटीस देऊन कायद्याची माहिती देणे गैर काय? काही व्यापा:यांनी स्वत:हूनच संपर्क साधून एलबीटी भरण्याची कबुली दिली आहे. सोमवार-मंगळवार्पयत कर संकलन होईल, असे जाधव म्हणाले.
मंगळवेढा। दि. 27 (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी संकट असताना पिण्याचे पाणी, जनावरांना पुरेसा चारा देण्यात प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडत असल्याने पदाधिका:यांसह शेतक:यांनी तहसीलदारांना धारेवर धरले. रेशनचे धान्य, रॉकेल, उजनीची अर्धवट कामे, लघुपाटबंधारे (जि.प.) या प्रश्नावरून आज मंगळवेढय़ाच्या आमसभेत गदारोळ माजला.
तालुक्यात 32 टॅँकरद्वारे 37 गावे व याखालील 277 वाडय़ावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हे टॅँकर प्रत्यक्षात 2-2 दिवस फिरकत नाहीत. गळके व कमी क्षमतेच्या टॅँकरनी अपूरा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कंठशोष करावा लागत आहे. काही टॅँकर दररोज पाणीपुरवठा करत नसल्याचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी मान्य करून ठेकेदारांना नोटीस काढली असल्याचे सांगितले. तर आ. भालके यांनी ठेकेदार बदलणे, एसएमएसद्वारे टॅँकर पोहोचलेल्याची नोंद करणे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या संयुक्त शिफारशीशिवाय ठेकेदाराची बिले अदा करू नये, अशी सूचना केली.
मागणीप्रमाणे चारा उपलब्ध केला जात नसल्याने जनावरांची उपासमार होत असल्याच्या तक्रारी अनेक पशुपालकांनी करताच भालके यांनी ‘दामाजी’ने चारा योग्य ऊस दोन दिवसात मागणीप्रमाणे चारा डेपोंना पुरवावा. एकही पशुपालक चा:याअभावी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच काही तलाठी चा:याचे पैसे भरून घेत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्या तलाठय़ावर कारवाईच्या सूचना प्रांताधिकारी बेलदार यांना आ. भालके यांनी दिल्या.
गत 40 वर्षापासून उजनीचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळाले नसून निधीअभावी कामे रखडली आहेत. निधी उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी केली जाणार असून 7 किंवा 8 मे रोजी दुष्काळी भागाच्या पाहणी दौ:यासाठी मुख्यमंत्री चव्हाण येणार असल्याचे आ. भालके यांनी सांगून उजनीची अपूरी कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पाणी तालुक्यातील 35 गावांना देण्याबाबत ठराव करण्यात आला. तालुक्याला केवळ 2 टीएमसी पाणी मिळते. उर्वरीत 3 टीएमसी पाणी इतर तालुके वापरत असल्याचे भालके म्हणाले. शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश गावकरे यांनी उजनीचे काही भागात अद्याप पाण्याचा पत्ताच नाही, तर पाणी नको म्हणून दिशाभूल करणारे ठरावाला विरोध केला.
जि.प. लघुपाटबंधारे कनिष्ठ अभियंता बडवे यांना विभागाची पुरेपूर माहिती नसल्याने शिपाई रणदिवे यांनी माहिती दिली. नादुरूस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यांना निधी देण्याचे आश्वासन जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांनी दिले. उचेठाण बंधा:यातील गळतीमुळे शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवले असून गळती थांबवण्याच्या सूचना नगरसेवक महादेव जिरगे, अजीत जगताप यांनी केल्या. सलगर बु।। येथील पाणलोटची कामे निकृष्ठ होत असल्याची तक्रार शेतक:यांनी केली.
शेळ्या-मेंढय़ांना चारा व जनावरांना पाणी द्यावे, अशी मागणी हैदर केंगार यांनी केली. मिरी, अर्धनारी येथे हद्द सोडून वाळू उपा होत असल्याची तक्रार दयानंद सोनगे यांनी केली. बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी ठराव घेण्यात आला. मुंबई येथे 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणारे दत्ता पडवळे यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. वीज बिल वसूलीसाठी वेठीस धरू नका, महसूलने 85 ची शेतक:यांची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी जि.प. आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील, सभापती संभाजी गावकरे, उपसभापती बाळासाहेब शिंदे, अॅड. नंदकुमार पवार, जि.प. सदस्य शिवाजी नागणे, पं.स. सदस्य संजय पवार, रावसाहेब राजमाने, प्रा. पी. बी. पाटील, गणेश गावकरे, येताळा भगत, अशोक माळी राजकुमार मांडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
.. तर बाराच्या भावात जाचाल
तालुक्यावर दुष्काळाचे संकट उभे असून तुम्ही जनतेला दिलासा देण्याऐवजी कामात कुचराई कराल तर बाराच्या भावात जाचाल असा सज्जड इशारा आ. भालके यांनी तहसीलदार किरणकुमार काकडे यांना दिला.