पुणे - पालिकेच्या टॅंकरसाठी तीनशे रुपयांपेक्षा जादा रक्कम आकारल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी पालिका आयुक्तांना दिले.
पुणे - ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) उच्च तंत्रज्ञानाचे 1500 सीसीचे थ्री सिलिंडर डिझेल इंजिन विकसित करण्यात यश मिळविले असून, या वर्षाअखेरीस ते बाजारात उपलब्ध होईल.
पुणे - दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) नागरिकांच्या यादीत खोटी माहिती देऊन कोणी समावेश करून घेतला असेल, तर त्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचना जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार होत आहे, निर्णय घेतले जात आहेत पण अंमलबजावणीच्या नावाने ओरड असल्याने पुणेकर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत अधिकच अडकत चालला आहे.
पुणे - कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती वीज ग्राहकांना मूळ थकबाकीवर 50 टक्के व्याज व 100 टक्के दंड माफ करणारी अभय योजना महावितरणने सुरू केली आहे.
पुणे - सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक करण्याचा प्रस्ताव असल्याची आणि सहकार कायद्यात बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
भोसरी - भोसरी पंचक्रोशीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या तरुणांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करून पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पुणे - पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कळविले नव्हते, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी उलट तपासणीत दिली.
पुणे - एखाद् दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पन्नास वर्षांनंतरही लोंबकळत पडला आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांनी शनिवारी व्यक्त केली.