M4मराठी.com विशेष

sangali

  • पुणे/काटेवाडी। दि. 26 (वार्ताहर)
    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात 2008-09 च्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत पुणे विभागाने बाजी मारली आहे. रावळगुंडवाडी (ता. जत, जि. सांगली) ग्रामपंचायतीस पहिल्या क्रमांकासह 25 लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.पुणे/काटेवाडी। दि. 26 (वार्ताहर)
    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात 2008-09 च्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत पुणे विभागाने बाजी मारली आहे. रावळगुंडवाडी (ता. जत, जि. सांगली) ग्रामपंचायतीस पहिल्या क्रमांकासह 25 लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
    द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. ‘अंठीपाडा’ (ता. नवापूर, जि. नंदुरबार) व देवगावला (ता. अचलपूर, जि. अमरावती) प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस पटकावले आहे. तृतीय क्रमांकासाठी पुणे विभागातील हातनूर (ता. तासगाव, जि. सांगली) व बहिरगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) या गावांना विभागून तृतीय क्रमांक व प्रत्येकी 7 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
    पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी एस. पी. खडे यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केल्याची माहिती मूल्यांकन समितीचे अध्यक्ष एकनाथ काटे यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना दिली.
    राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषदेचा पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेला मिळाला आहे. 10 लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    शासनाने विशेष पुरस्कारही जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय स्वच्छ सुंदर साने गुरुजी शाळेचा प्रथम क्रमांकाचा 3 लाखांचा पुरस्कार देवगावला (ता. अचलपूर, जि. अमरावती), तर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडीचा 10 लाखांचा प्रथम पुरस्कार हातनूरने (ता. तासगाव) पटकाविला आहे.
    कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार नायगाव (ता. वणी, जि. यवतमाळ) व नाचणभट्टी (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) या गावांना विभागून मिळाला आहे. पाणी व्यवस्थापनाचा स्व. वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार सनगावने (ता. अंबाजोगाई, जि. बीड) प्राप्त केला आहे. सामाजिक एकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार पिंपळगाव (ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) व सनगाव (जि. बीड) या गावांना विभागून प्रत्येकी दीड लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
  • सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँडवर हल्ला करुन मोडतोड केल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रशांत खिलारे यांच्यासह अकरा जणांना अटक केली. यामध्ये खिलारे गटाचे सहा व हॉटेल पाच कामगारांचा समावेश आहे. दरम्यान दोन्ही गटाने परस्परविरुद्ध तक्रार केल्याने दोन्ही गटाच्या चाळीसजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँडवर हल्ला करुन मोडतोड केल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रशांत खिलारे यांच्यासह अकरा जणांना अटक केली. यामध्ये खिलारे गटाचे सहा व हॉटेल पाच कामगारांचा समावेश आहे. दरम्यान दोन्ही गटाने परस्परविरुद्ध तक्रार केल्याने दोन्ही गटाच्या चाळीसजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    अटक केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक प्रशांत आप्पासाहेब खिलारे (वय 44), मनिष आप्पासाहेब खिलारे (42), अभिजीत रवींद्र कोरे (40), आकाश प्रकाश खिलारे (24), पवण श्रीकांत खिलारे (23, सर्व रा. गावभाग, सांगली) व संजय निळकंठम मांगले (43, रा. कोल्हापूर रोड, सांगली) व हॉटेलमधील कामगार दिपक विनायक डिश्वास (20), अजय नारायण डिश्वास (22), अमित नारायण डिश्वास (19), प्रवीण रवी बरमन (19) व सडोती डिमल डिश्वास (25, सर्व, रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.
    हॉटेलमधील सफाई कामगार रॉबीन निशीत डिश्वास याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत खिलारेंसह 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऑर्डर देण्यास विलंब लावला या कारणावरुन खिलारे गटाने हल्ला करुन बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खिलारे गटाकडून मनिषने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण शेट्टी याच्यासह 10 ते 15 अनोळखी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    प्रशांत खिलारे यांना मारहाण करीत असताना ते पहायला गेल्यानंतर हॉटेलमधील सर्व कर्मचार्‍यांनी आमच्यावर हल्ला करुन मारहाण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा दोन्ही गटाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला.
    प्रशांत खिलारेंना बुधवारी रात्रीच ताब्यात घेतले होते. आज त्यांच्या सर्व समर्थकांनाही अटक केली. खिलारे गटाला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने 28 एप्रिलर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हॉटेलमधील पाच कामगारांना आज रात्री उशिरा अटक केली. त्यांना उद्या (शुक्रवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. हॉटेल मालक गणेश शेट्टी फरारी असल्याचे पोलीस निरीक्षक भीमानंद नलावडे यांनी सांगितले.
  • सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    महापालिका हद्दीतील जातीनिहाय जनगणनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षक व कर्मचार्‍यांनी आधी थकित मानधन द्या, मगच प्रशिक्षण घेऊ, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशिक्षण कार्यक्रमात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. अखेर येत्या 15 दिवसात थकित मानधन देण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर प्रशिक्षण सुरळितपणे सुरू झाले.सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    महापालिका हद्दीतील जातीनिहाय जनगणनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षक व कर्मचार्‍यांनी आधी थकित मानधन द्या, मगच प्रशिक्षण घेऊ, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशिक्षण कार्यक्रमात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. अखेर येत्या 15 दिवसात थकित मानधन देण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर प्रशिक्षण सुरळितपणे सुरू झाले.
    गतवर्षी जनगणनेचे काम पालिकेकडील शिक्षक व कर्मचार्‍यांनी केले होते. एकूण दोन टप्प्यात झालेल्या गणनेत त्यांनी काम केले. त्यापोटी काही जणांना मानधन मिळाले, तर काहीजण अद्यापही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
    आता लवकरच जातीनिहाय जनगणनेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी याच कर्मचारी व शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आले होते. शक्षक उपस्थित होते. पालिकेचे शाखा अभियंता कमलेकर यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात झाली. प्रारंभीच कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत, गतवर्षीचे मानधन अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे मानधन दिल्याशिवाय प्रशिक्षण घेणार नाही, अशी भूमिका घेतली. काही कर्मचारी व्यासपीठासमोर येऊन, मानधन द्या, मगच प्रशिक्षण घेऊ, अशा जोरदार घोषणाही देत होते. यात महिलाही आघाडीवर होत्या. अखेर कमलेकर यांनी, मानधनाचा धनादेश आला असून येत्या 15 दिवसात त्याचे वाटप केले जाईल, असे जाहीर केल्यानंतर सर्वजण शांत झाले. त्यानंतर प्रशिक्षण शिबिर सुरळीतपणे सुरू झाले.
  • सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    जिल्ह्यातील दीडशे शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव शासनाने गेल्या दोन वर्षापासून रोखून ठेवले आहेत़ शासनाच्या या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापकांची चांगलीच धावपळ उडाली आह़े दरम्यान, शासनाला न जुमानता इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या 16 शाळा अनधिकृत सुरू असून, त्यांच्यावर शासनाच्या कारवाईची टांगती तलवार आह़ेसांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    जिल्ह्यातील दीडशे शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव शासनाने गेल्या दोन वर्षापासून रोखून ठेवले आहेत़ शासनाच्या या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापकांची चांगलीच धावपळ उडाली आह़े दरम्यान, शासनाला न जुमानता इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या 16 शाळा अनधिकृत सुरू असून, त्यांच्यावर शासनाच्या कारवाईची टांगती तलवार आह़े
    पालकांचा इंग्रजी शाळांकडील कल वाढत आह़े इंग्रजी प्रवेशासाठी हजारो रुपये मोजण्याचीही त्यांची तयारी असल्यामुळे इंग्रजी शाळांचे दिवसेंदिवस पेव फुटत आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये इंग्रजी शाळा सुरू होत आहेत़ 2010-11 मध्ये चक्क जिल्ह्यातून दीडशे इंग्रजी शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले होत़े यापैकी सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे पाठविल़े दोन वर्षात दीडशे प्रस्तावांपैकी एकाही इंग्रजी शाळेला शासनाने मंजुरी दिली नाही़ मराठी शाळांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शासनाने इंग्रजी शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव रोखले आहेत़ संस्था चालकांनी अनेक प्रयत्न करूनही प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्यामुळे तेही चांगलेच अडचणीत आले आहेत़ शासन मान्यता देईल, या अपेक्षेवर काही शाळांनी वर्ग सुरू केले आहेत़ अशा जिल्ह्यात 16 अनधिकृत शाळा सुरू असून, त्यापैकी आठ शाळा सांगलीत सुरू आहेत़ उर्वरित तासगाव, आटपाडी, कडेगाव तालुक्यातील शाळांचा समावेश आह़े या शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होणार आह़े प्राथमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले यांनी पालकांनी कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये विद्याथ्र्याना घालू नय़े भविष्यात विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास शासन जबाबदार असणार नाही, असे आवाहनही केले आह़े
  • सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    कृष्णेचे पाणी डोर्ली (ता़ तासगाव) र्पयत पोहोचले असून, दोन दिवसांत सिध्देवाडी तलावार्पयत पोहोचेल़ आठ दिवसांत बाणूरगड प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील सहा गावांना कृष्णेचे पाणी मिळेल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
    निम्म्या जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आह़े यात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ आटपाडी आणि जत तालुक्यांना बसली आह़े आटपाडी तालुक्यात टँकर भरण्याठीही पाणी उपलब्ध नाही़ जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रयत्नामुळे सांगोल्यातून टँकर भरण्याची सहमती मिळाली आह़े तरीही टँकरच्या फारशा फेर्‍या होत नाहीत़ यामुळे प्रशासनाने कृष्णेचे पाणी बाणूरगड प्रादेशिक पाणी योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात नेता येईल, अशी सूचना केली होती़ त्यानुसार राज्य शासनाने टंचाई निधीतून बाणूरगड प्रादेशिक योजनेची तातडीने दुरुस्ती करावी़ विद्युत बिलही टंचाईतून भरून तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार शासनाने बाणूगरड प्रादेशिक योजनेच्या विद्युत पंप दुरुस्तीसह अन्य कामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आह़ेसांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    कृष्णेचे पाणी डोर्ली (ता़ तासगाव) र्पयत पोहोचले असून, दोन दिवसांत सिध्देवाडी तलावार्पयत पोहोचेल़ आठ दिवसांत बाणूरगड प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील सहा गावांना कृष्णेचे पाणी मिळेल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
    निम्म्या जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आह़े यात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ आटपाडी आणि जत तालुक्यांना बसली आह़े आटपाडी तालुक्यात टँकर भरण्याठीही पाणी उपलब्ध नाही़ जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रयत्नामुळे सांगोल्यातून टँकर भरण्याची सहमती मिळाली आह़े तरीही टँकरच्या फारशा फेर्‍या होत नाहीत़ यामुळे प्रशासनाने कृष्णेचे पाणी बाणूरगड प्रादेशिक पाणी योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात नेता येईल, अशी सूचना केली होती़ त्यानुसार राज्य शासनाने टंचाई निधीतून बाणूरगड प्रादेशिक योजनेची तातडीने दुरुस्ती करावी़ विद्युत बिलही टंचाईतून भरून तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार शासनाने बाणूगरड प्रादेशिक योजनेच्या विद्युत पंप दुरुस्तीसह अन्य कामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आह़े
    धनगाव (ता़ पलूस) येथून सावळज पूरक योजनेत पाणी सोडण्यात येत आह़े सावळज योजनेचे पाणी सुरू करून महिना झाला असून, आता डोर्लीर्पयत पाणी पोहोचले आह़े दोन दिवसांत सिध्देवाडी तलावात पाणी पोहोचणार आह़े सिध्देवाडी तलावात बाणूरगड प्रादेशिक योजनेची विहीर आह़े येथे पाणी सोडून बाणूरगड योजनेला पाणीपुरवठा केला जाणार आह़े बाणूरगड योजना खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील 14 गावांसाठीची आह़े यामध्ये आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, मानेवाडी, मेटकरवाडी, हिवतड, काळेवाडी, गोमेवाडी गावांचा समावेश असून, तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आह़े
  • विटा। दि. 26 (वार्ताहर)
    सांगलीहून कडेपूरकडे भरधाव निघालेल्या टाटा इंडिका कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील विटय़ाच्या आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी ठार झाला. उपेंद्र लक्ष्मणराव थोरात (21, रा. सावंतपूर, ता. पलूस) असे ठार झालेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) फाटय़ानजीक घडली.विटा। दि. 26 (वार्ताहर)
    सांगलीहून कडेपूरकडे भरधाव निघालेल्या टाटा इंडिका कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील विटय़ाच्या आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी ठार झाला. उपेंद्र लक्ष्मणराव थोरात (21, रा. सावंतपूर, ता. पलूस) असे ठार झालेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) फाटय़ानजीक घडली.
    उपेंद्र थोरात हा विटय़ातील आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकलच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. गुरुवारी परीक्षेच्या पेपर देऊन तो हिरोहोंडा शाईन मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. 10-एपी- 6927) सावंतपूरकडे निघाला होता. तो बलवडी (भा.) फाटय़ाजवळ आला असताना जुना सातारा रस्त्यावरून सांगलीहून कडेपूरकडे भरधाव वेगात जाणार्‍या इंडिका कारने (क्र. एम. एच.45-एन-272) मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात उपेंद्र याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी सांगलीला घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा उपेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. अपघातानंतर इंडिका कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
  • सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    आम्हाला कोण विचारणार? असे म्हणून नियमांचे उल्लंघन करणार्‍या शहरातील रिक्षाचालकांना आरटीओ सुधाकर बुधवंत यांनी चांगलाच दणका देण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या लूटमारीचे अड्डे बनलेल्या रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर रिक्षांची तपासणी करून नियमबाह्य 20 रिक्षा जप्त केल्या आहेत. दररोज सुरू असलेल्या या कारवाईच्या भीतीने थांब्यावरून रिक्षाच गायब झाल्या आहेत.सांगली। दि. 26 (प्रतिनिधी)
    आम्हाला कोण विचारणार? असे म्हणून नियमांचे उल्लंघन करणार्‍या शहरातील रिक्षाचालकांना आरटीओ सुधाकर बुधवंत यांनी चांगलाच दणका देण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या लूटमारीचे अड्डे बनलेल्या रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर रिक्षांची तपासणी करून नियमबाह्य 20 रिक्षा जप्त केल्या आहेत. दररोज सुरू असलेल्या या कारवाईच्या भीतीने थांब्यावरून रिक्षाच गायब झाल्या आहेत.
    प्रवाशांबरोबर असभ्य वर्तन, जादा भाडे आकारणे, गणवेश परिधान न करणे, मीटर बंद या कारणांमुळे रिक्षा व्यवसाय प्रवाशांना धोकादायक ठरत आहे. प्रवासी तक्रार करीत नाही, आरटीओ कधीच कारवाई करीत नाहीत, या अविर्भावात असलेल्या रिक्षाचालकांविरुद्ध ‘लोकमत’मधून लेखमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वाचकांनी चालकांच्या मनमानी व्यवसायाच्या कारनाम्यांचा पाढाच वाचून दाखविला. बुधवंत यांनाही या लेखमालिकेची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले.
    रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर प्रवाशांची लूटमार करण्याचा धंदाच सुरू होता. संघटनेच्या पदाधिकार्‍यांना या लूटमारीची खबर नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही ठिकाणी बुधवंत यांच्या पथकाने बुधवारी रात्री व आज अचानक छापा टाकून रिक्षा व चालकांची तपासणी मोहीम सुरू केली. कागदपत्रे अपूर्ण असणे, मीटर बंद, गणवेश न घालणे, बेकायदा गॅसचा वापर यासह अनेक नियमांचे उल्लंघन करणारे पंचवीस रिक्षाचालक दोषी आढळले. यातील वीस रिक्षा जप्त करून त्यांना मेमोही देण्यात आला असल्याचे बुधवंत म्हणाले. रिक्षा तपासणीची ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे, असा इशाराही बुधवंत यांनी दिला.
    दरम्यान, बुधवंत यांनी सुरू केलेल्या कारवाईच्या दणक्याने रिक्षाचालकांमध्ये खळबळ माजली आहे. ही कारवाई रोखण्यासाठी काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी प्रय}ही सुरू केले आहेत. मात्र बुधवंत यांनी त्यांना दाद दिली नाही. यामुळे कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक थांब्यांवरून रिक्षा गायब झाल्या आहेत. सध्या प्रत्येक थांब्यावर चार ते पाचच रिक्षा थांबलेल्या दिसतात.
  • कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    धडकी भरवणार्‍या विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने तासभर झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली, तर कोणत्याही भागात गेले तर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. सायंकाळी नोकरीवरून घरी परतणार्‍यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. तर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हॉटेल शिवतारा येथे वादळी वार्‍याने आणि मुसळधार पावसामुळे झाड पडल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    धडकी भरवणार्‍या विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यासह आज सायंकाळी कोल्हापूर शहर व परिसराला वळवाच्या पावसाने तासभर झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली, तर कोणत्याही भागात गेले तर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. सायंकाळी नोकरीवरून घरी परतणार्‍यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. तर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हॉटेल शिवतारा येथे वादळी वार्‍याने आणि मुसळधार पावसामुळे झाड पडल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
    आज पाच वाजल्यापासूनच पावसाची चाहूल लागली होती. धुळीचे लोट हवेत घिरटय़ा घालत होते. सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हलकी सर आली आणि पाऊस सुरू झाला. पाठोपाठ विजांचा कडकडाट सुरू झाला. बघता-बघता पावसाने जोर धरला. तब्बल तासभर टपोर्‍या थेंबाचा पाऊस पडत होता. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्ते प्रकल्पातील गटर्सची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. फळे-भाजापीला विक्रेते, फिरते विक्रेते यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. पावसात अडकलेल्या लोकांना घरी जाण्यासाठी रिक्षा हवी होती; परंतु ती मिळत नव्हती. कदमवाडी भागात मशिदीजवळ, टेंबलाईवाडी परिसरात झाड पडले. सदर बझार परिसरात वायरिंग जळाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
    वृक्ष कोसळलीत..
    मुसळधार पावसामूळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामूळे सर्वत्र काळोख्याचे साम्रज्या पसरले होते. त्याचबरोबर शिवाजी पार्क येथील प्रिन्स कॉलनी, शिवाजी पेठेतील न्यु कॉलेजच्या पिछाडिस असणार्‍या फिरंगाई कमानीजवळ तसेच अन्य भागातही झाडे पडली होती. रात्रीर्पयत ही झाडे हालवण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान करत होते.
    कोल्हापूर-सांगली वाहतूक ठप्प
    आज (गुरुवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस व वादळी वार्‍याने शिरोली परिसराला झोडपून काढले. यात सोसाटय़ाच्या वार्‍यात कोल्हापूर-सांगली रस्त्यावर जैन मंदिर, हॉटेल कैलास, हॉटेल शिवतारा येथे जागो-जागी
    वृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी वाहने व सांगलीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहने पेठवडगाव मार्गे वळवण्यात आली,
  • कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    कार्यालयात फायली ठेवायला जागा नाही.. कर्मचार्‍यांची सततची वानवा.. या ठिकाणी नियुक्ती होऊनही हजर व्हायला कोणी तयार नाही..दाखल्यांच्या प्रकरणांचा वाढता ओघ..अशा स्थितीमुळे कोल्हापूरपेक्षा गडचिरोलीला गेलेले बरं.. हे उद्गार आहेत सहायक आयुक्त तथा विभागीय जातपडताळणी समिती सदस्य सचिव रवींद्र कदम-पाटील यांचे. काल (बुधवार) शिवसेनेने केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असे हताश उद्गार काढले. या आंदोलनामधील जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह 15 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    कार्यालयात फायली ठेवायला जागा नाही.. कर्मचार्‍यांची सततची वानवा.. या ठिकाणी नियुक्ती होऊनही हजर व्हायला कोणी तयार नाही..दाखल्यांच्या प्रकरणांचा वाढता ओघ..अशा स्थितीमुळे कोल्हापूरपेक्षा गडचिरोलीला गेलेले बरं.. हे उद्गार आहेत सहायक आयुक्त तथा विभागीय जातपडताळणी समिती सदस्य सचिव रवींद्र कदम-पाटील यांचे. काल (बुधवार) शिवसेनेने केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असे हताश उद्गार काढले. या आंदोलनामधील जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह 15 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    चार दिवसांपूर्वी शिवसेनेने शिष्टमंडळ घेऊन येणार असे सांगितले होते. मात्र, कार्यकत्र्यानी मोर्चा काढून येथील कर्मचारी दारू पिऊन काम करतात असे आक्षेपार्ह विधान केले. जात पडताळणी अधिनियम कलम 9 अन्वये दिवाणी न्यायालयाचे अधिकार सदस्य सचिवाला असतात. त्यानुसार काल सुनावणी सुुरू असताना दारूच्या बाटल्या सोबत आणत आंदोलन करून शिवसेनेने शासकीय कामात अडथळा आणल्याचे सांगून जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उदय कुलकर्णी, कमलाकर जगदाळे, शशी बीडकर, दत्ता टीपुगडे यांच्यासह 15 जणांविरोधात पोलिसांत आज दुपारी गुन्हा दाखल केला असल्याचे कदम-पाटील यांनी सांगितले.
    जात पडताळणी कार्यालयात सध्या अपुरा स्टाफ आहे. याचा परिणाम कामाच्या दिरंगाईवर होत असून, तरीही महत्त्वाचे दाखले वेळेत निर्गत झाल्याचे सांगताना सध्या समितीकडे 5 हजार 303 दाखल्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात सातारा -1708, सांगली-2141 व कोल्हापूर-1454 प्रकरणांचा समावेश आहे. कोल्हापूर कार्यालयासाठी शासनाकडून 24 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 15 भरलेली आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष कामावर 9 जण आहेत.
    इंजिनिअरिंग डिग्री, मेडिकल, अ‍ॅग्री, एम.बी.ए. आदी शाखांना दाखल्यांची आवश्यकता असताना डिप्लोमा, डी.एड्., बी.एड्., बी.एस्सी, एम.एस्सी या शाखांची आवश्यकता नसतानाही प्रकरणे येत असतात. याबाबत शासनाला कळवूनही शासनाने याची दखल घेतली नसल्याचे कदम-पाटील यांनी सांगितले.
  • अभय व्हनवाडे । दि. 26 (रुकडी/माणगाव)
    नवीन गॅस कनेक्शनबरोबर गॅस शेगडी घेणे सक्तीचे करू नये, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. गॅस वितरण एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अ‍ॅँड डिस्ट्रीब्युशन) विभागास तसे निर्देश दिले आहेत.अभय व्हनवाडे । दि. 26 (रुकडी/माणगाव)
    नवीन गॅस कनेक्शनबरोबर गॅस शेगडी घेणे सक्तीचे करू नये, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. गॅस वितरण एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अ‍ॅँड डिस्ट्रीब्युशन) विभागास तसे निर्देश दिले आहेत.
    मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता गॅस वितरण एजन्सींना कार्यालयात नवीन गॅस कनेक्शनबरोबर गॅस शेगडी घेणे सक्तीचे नाही, असा फलक मराठी व इंग्रजी भाषेत दर्शनी भागावर लावावा लागणार आहे. याशिवाय गॅस वितरण एजन्सीने इतर साहित्य विक्रीस ठेवले असल्यास त्याची पावती सक्तीने ग्राहकांना द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर एजन्सीने कार्यालयामध्ये गॅस शेगडीचा ब्रॅँड व विक्रीमूल्य तसेच गॅस सिलिंडरच्या अधिकृत विक्री किमतीबाबतचा फलक लावण्याची सक्ती केली आहे. एजन्सीने नवीन गॅस कनेक्शन देताना त्याबाबतची रक्कम धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टने दिली तरी ते स्वीकारावी लागणार आहे.
    गॅस वितरण एजन्सीने ग्राहकांकडून विक्रीमूल्यापेक्षा जास्त पैसे घेतले असतील व पावत्या न देणे, जादा आकार घेणे, गॅसबाबतची अनियमितता निदर्शनास आल्यास सदर गॅस एजन्सी रद्द करण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना संबंधित तेल कंपन्यांच्या राज्यस्तरीय समन्वयकांना द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत. गॅस एजन्सी ग्राहकांना देत असलेल्या सुविधांबाबत संबंधित अधिकार क्षेत्रातील तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांनी ग्राहकांशी संपर्क साधून सुविधांबाबत माहिती घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गॅस एजन्सीधारकांचे धाबे दणाणले आहेत.
  • कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्या प्रशासकाबाबत काय निर्णय घ्यायचा यासंबंधीचा अभिप्राय शासनाकडून मागवण्यात येणार आहे. विद्यमान प्रशासक डॉ.सुधीरकुमार गोयल व सुधीर श्रीवास्तव यांनी आपल्याला मुदतवाढ देवू नये असे पत्र शासनाला दिले असल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असा अभिप्राय मागवण्यात येणार आहे.कोल्हापूर। दि. 26 (प्रतिनिधी)
    महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्या प्रशासकाबाबत काय निर्णय घ्यायचा यासंबंधीचा अभिप्राय शासनाकडून मागवण्यात येणार आहे. विद्यमान प्रशासक डॉ.सुधीरकुमार गोयल व सुधीर श्रीवास्तव यांनी आपल्याला मुदतवाढ देवू नये असे पत्र शासनाला दिले असल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असा अभिप्राय मागवण्यात येणार आहे.
    प्रशासकपदाची मुदत पाच वर्षार्पयतही असू शकते. संबंधित संस्था अडचणीतून बाहेर आल्याची शासनाची खात्री झाल्यानंतर तिथे प्रशासकानेच निवडणूक घेवून ती संस्था लोकनियुक्त संचालकमंडळाकडे सोपविण्याची पध्दत आहे.
    राज्य बँकेची आर्थिक स्थिती सुधारली असली तरी या बँकेची निवडणूक कधी होणार हे अद्याप अनिश्चित आहे. कारण बँकेच्या व्यवहाराशी संबंधित 11 मुद्दय़ांबाबत नाबार्डचा अहवाल आल्याशिवाय त्यासंबंधीचा निर्णय होवू शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया होईर्पयत तेच प्रशासक मंडळ राहू शकते. परंतू गोयल व श्रीवास्तव यांची आपल्या मुळ विभागांचा कामाचा व्याप जास्त असल्याने प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे असे पत्र शासनाला पाठविले आहे.
    सहा मे रोजी त्यांना प्रशासक म्हणून एक वर्ष होत आहे. त्यामुळे गोयल व श्रीवास्तव यांना प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त करायचे का व तसे केल्यास ही जबाबदारी कुणाकडे दिली जावी यासंबंधीचा अभिप्राय सहकार विभाग सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे मागवणार आहे. त्यांच्याकडून मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याशी चर्चा होवून त्याचा निर्णय होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे काय म्हणतात यावरच त्यासंबंधीचा निर्णय अवलंबून असेल.
    दरम्यान श्री.गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मला याविषयावर वृत्तपत्रांशी बोलायचे नाही असे सांगितले. सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ मुदतवाढ दिली जावू नये असे श्री.गोयल यांचे पत्र शासनाला मिळाले आहे.
    सहा महिन्यापूर्वीच त्यांनी ही विनंती केली होती. शासनाशी चर्चा करून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल.
    बँकींग क्षेत्रातील कामाचा अनुभव व व्यावसायिक दृष्टीकोन असणार्‍या अधिकार्‍यास अशी संधी दिली जावू शकते.’’
  • पोलीस बंदोबस्तात कवलापूरजवळून शेरीनाल्याची पाईपलाईन टाकण्याचा निर्णय आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेरीनालाप्रश्नी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.सांगली। दि. २६ (प्रतिनिधी)

    पोलीस बंदोबस्तात कवलापूरजवळून शेरीनाल्याची पाईपलाईन टाकण्याचा निर्णय आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेरीनालाप्रश्नी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
    या बैठकीला महापालिका स्थायी समितीचे सभापती मकरंद देशपांडे, आयुक्त संजय देगावकर, पाणी पुरवठा अधिकारी सुनील पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, कवलापूरच्या सरपंच रेखा माळी यांच्यासह कवलापूर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
    सांगलीतील शेरीनाल्याचे पाणी उचलून धुळगाव (ता. तासगाव)येथील शेतीला देण्याची सुमारे दहा वर्षांची योजना आहे. या योजनेची पाईपलाईन टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, कवलापूरजवळील १४00 मीटर लाईन टाकण्याने काम थांबले आहे.
    यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून शेरीनाल्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तीन पर्याय सूचवण्यात आले होते. त्यामध्ये कवलापूरजवळून पाईपलाईप टाकणे, विमानतळाच्या पाचशे मीटर अंतरावरून व विमानतळाशेजारून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव होता. यामधील विमानतळाजवळून पाईप लाईन टाकण्याचा प्रस्ताव कवलापूर ग्रामपंचायतीने ठराव करून संमती दिली आहे. या ठरावाला आज प्रशासनाने मंजुरी दिली. या प्रस्तावाला ज्यांच्या जमिनीमधून पाईपलाईन जाते, अशा १५पैकी चार शेतकर्‍यांनी मंजुरी दिली आहे. उर्वरितांचीही मंजुरी घेण्यात येणार आहे. यापुढे कामाच्या पूर्ततेसाठी पोलीस बंदोबस्तात काम करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला.


  • Copyright 2011-12 m4marathi.com