कोथिंबिरीचा झुणका

साहित्य :-zunka

१)      कोथिंबीर एक जुडी

२)     हरभरा डाळ एक वाटी

३)     कांदे दोन मोठे

४)     लसूण कांदा एक

५)    हिरव्या मिरच्या पाच-सहा

६)      तेल पळीभर

७)    हळद अर्धा चमचा

८)     धने एक चमचा

९)      जिरं एक चमचा

१०)  चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      कोथिंबीरीच्या जाड काडया काढून ती बारीक चिरून , धुऊन निथळून घ्यावी . 

२)     डाळ तीन तास आधी भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटावी . 

३)     वाटताना त्यामध्ये लसूण , धने , जिरं आणि चमचाभर मीठ टाकावं . 

४)     वाटलेलं मिश्रण हळद घालून कोथिंबीरीमध्ये एकजीव करावं .  कांदा उभा     पण जाडसर चिरावा . 

५)    जिरं-मोहरीची फोडणी करून कांदा घालावा .  कांदा बदामी रंगाचा झाल्यावर एकजीव केलेलं मिश्रण घालावं . 

६)      अलगद हलवावं .  पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी . 

७)    नंतर परत अलगद हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता शिजू दयावी . झुणका गरम असतानाच भाकरी किंवा पराठ्यासोबत वाढवा .