क्रेप

साहित्य :-crepes-1

१)      एक वाटी मैदा

२)     अर्धी वाटी दुध

३)     दोन अंडी

४)     एक मोठा साखर

५)    एक मोठा चमचा लोणी

६)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      अंडी  भरपूर फेसून दुध आणि साखर घालून पुन्हा फेसावं . 

२)     मैदा मीठ एकत्र करून त्यात मिसळावं .  मिश्रण गुळगुळीत आणि पातळ     झालं पाहिजे . 

३)     तवा तापवून त्यावर एक डावभर मिश्रण ओतावं आणि तवा फिरवून ते संबंध तवाभर पसरावं .

४)     बाजूनं तूप सोडावं .  एक-दोन मिनिटांनी उलटावं .  क्रेप वर जायफळ किंवा दालचिनीमिश्रीत पिठीसाखर घालून खायला दयावा . 

५)    यात स्ट्रोबेरी , पीच , पेअर अशा फळांचे पातळ काप घालून गुंडाळी करून   खायला देतात .