छोले-भटुरे , पाव

साहित्य :-Chole-Bhature

१)      पाव किलो कबुली चणे

२)     २ ते ३ कांदे , ४ ते ५ टोमाटो

३)     चिंचेचा रस थोडा चवीला , दोन तमालपत्र

४)     तीन टेबल स्पून तेल , एक टेबल स्पून जिरे

५)    दोन चमचे पादेलोण (काळ मीठ) , दोन चमचे तिखट

६)      अर्धा चमचा गरम मसाला , पाव चमचा हळद

७)    अर्धा चमचा कसूरी मेथी , कोथिंबीर

८)     एक चमचा आले-लसूण पेस्ट

९)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत .  दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये दोन शिट्टया येऊ देऊन थोडा वेळ गैस बारीक करून ठेवावा .

२)     चणे नरम शिजले पाहिजेत .  जिरे , काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी . 

३)     तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा .   आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे .

४)     टोमाटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे .  कांदा-टोमाटो एकजीव झाला पाहिजे . 

५)    त्यात हळद , तिखट , थोडे मीठ , जिरे व काळे मीठ पावडर टाकून परतून घ्यावे .    शिजवलेले चणे टाकावे . 

६)      चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे .  चण्याला थोडा रस्सा ठेवावा .  कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .

भटुरा :-

१)      चार उकडलेले बटाटे किसून त्यात दोन ते तीन टेबल स्पून मैदा टाकावा , चिमुटभर खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकावी . 

२)     चवीनुसार मीठ टाकावे .  सर्व एकत्र मळून त्याच्या मोठया पुऱ्या लाटून तळाव्या .

ब्रेडसोबत देतांना :-

१)      ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर छोले टाकावे .  बारीक चिरलेला कांदा टाकावा . 

२)     कांदयावर बारीक शेव टाकून वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .