ज्वेलरी सजवा नेलपेंटने

jewellery 1इमिटेशन ज्वेलरीची खरेदी बहुदा मॅचिंग ड्रेस, साडी याकरिताच केली जाते. बर्‍याचदा परफेक्ट मॅचिंग मिळत नाही, अशावेळी जे दागिने खरेदी केलेले असतात त्यांच्यावरती हव्या त्या रंगाच्या पारदर्शक नेलपेंटचे थर देऊन मॅचिंग ज्वेलरी घरच्या घरी बनवता येईल. याकरीता जे नेलपेंट वापरावे लागते ते चांगल्या दर्जाचे असावे, नेलपेंटचा थर देताना सर्वप्रथम दागिन्यांच्या एका बाजूला छोटासा स्पॉट रंगवावा. रंगसंगती आकर्षक वाटली, पेंट योग्यप्रकारे बसतोय असे वाटले तरच संपूर्ण दागिना नेलपेंटने रंगवा. नेकलेस, दोन-तीन वेढणीच्या बांगड्या, अंगठय़ा, अँकलेटस, पैंजण आदी दागिन्यांवर हा प्रयोग करता येऊ शकेल. शक्यतो नेकलेसच्या मधल्या पदरावरती हलक्या हाताने पेंटिंगचे काम करा. नेल रिमूव्हरचा उपयोग करून नेलपेंट दागिन्यांपासून काढता येतो. अडगळीत पडलेल्या दागिन्यांवरही हा प्रयोग करून नवी झळाळी देता येईल.