तिळाचा भात

karivepaaku_annam

 

 

 

साहित्य :-  

१)      एक वाटी तांदळाचा मोकळा शिजवलेला भात

२)     पाव वाटी शेंगदाणे किंवा काजूचे तुकडे

३)     एक मोठा चमचा सुक्या मिरच्यांचे तुकडे

४)     कढीलिंबाची दहा-बारा पान

५)    एक चमचा उडदाची डाळ

६)      मोहरी , हिंग

७)    हळद , तेल

८)     आवडीनुसार लिंबाचा रस

९)      चवीनुसार मीठ .  

तिळकुटासाठी :-  

१)      अर्धी वाटी तिळ

२)     पाव वाटी किसलेलं खोबरं

३)     पाच-सहा सुक्या मिरच्या

४)     अर्धा चमचा हिंग

५)    दोन चमचा तेल

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-  

१)      तीळ कोरडे भाजून घ्यावे .  तेलावर मिरच्या आणि खोबरं भाजून घेऊन त्यात तीळ , हिंग , मीठ घालून गार झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पूड करावी .  

२)     परातीत भात मोकळा करून घेऊन त्यामध्ये ही पूड मिसळावी .  

३)     थोडया तेलात शेंगदाणे , काजू तळून घेऊन ते भातात मिसळावे .  

४)    उरलेल्या तेलात मोहरी , हिंग , हळद , उडीद डाळ , सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता फोडणीला घालून ती फोडणी भातावर घालून भात कलवावा .  लिंबाचा रस घालून खायला द्यावा .