पनीर भुर्जी

साहित्य :-paneer-bhurji-recipe

१)      शंभर ग्रॅम पनीर

२)     २ ते ३ मध्यम कांदा बारीक चिरलेले

३)     २ ते ३ टोमाटो बारीक चिरलेले

४)     एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट

५)    हळद , लाल तिखट

६)      मसाला , थोडी कोथिंबीर

७)    एक टेबल स्पून तेल

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तेलात कांदा नरम करावा .  त्यात आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे .  नंतर टोमाटो टाकून परतून घ्यावे . 

२)     टोमाटो नरम झाला की त्यात पाव चमचा हळद , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला टाकून मीठ टाकावे . 

३)     पनीर बारीक कुस्करून त्यात टाकावे व चांगले ढवळून वाफ काढावी .  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .

भुर्जी पराठा :-

१)      ह्या भूर्जीचा उपयोग करून भुर्जी-पराठाही करता येतो .  दोन लहान चपात्या लाटून एका चपातीवर भुर्जी पसरून घ्यावी . 

२)     त्यावर दुसरी चपाती टाकून कडा बंद करून घ्याव्यात व तव्यावर दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्यावी .  भाजताना तूप किंवा तेल पराठ्याच्या बाजूने सोडावे .