परीक्षेचं फयाण वादळ

TU24_EXAM_76224fसध्या १०वी १२ वी च्या परीक्षा सुरु आहेत विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांचीच धावपळ पाहायला मिळते. परीक्षा केंद्रात तर जणू मोठी यात्राच जमलेली असते.

आपल्या पालकांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन बिचारी मुलं मोठ्या दडपणाखाली पेपर लिहित असतात ….  काही मुलांवर तर इतकं  दडपण असत की केलेला अभ्यास देखील ऐनवेळेस सुचेनासा होतो.
त्यातल्या त्यात स्कॉड नावाचं फयाण वादळ काही मुलांच्या विचारांमध्ये सतत घोंघावत राहत.
आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही?आपण पास होणार की नाही? कमी टक्के मिळाले तर आई -बाबा नाराज होतील,नापास झालो तर गल्लीतली पोर चिडवतील. अ ब ब …… किती प्रश्न त्या विध्यार्थ्यांच्या डोक्यात चालु असतात.
मुळात बोर्डाच्या परीक्षेला दिलं जाणार अवास्तव महत्व ह्यांमुळे मुलं मानसिक रित्या गोंधळून जातात,
आयुषातली मोठी लडाईच आपण लढत आहोत आणि  ती कुठल्याही प्रकारे आपल्याला जिंकायचीच आहे असा विचार मुलांनी मनोमन केलेला असतो त्यामुळे कॉपी  सारखे गैरप्रकार घडतात,कमी गुण मिळाल्यावर मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो,त्यांच्यामध्ये अपराध्याची भावना निर्माण होते.
त्यामुळे पालकांनी  मुलांना विश्वासात घ्यायला हवं, नुसती अपेक्षाच न बाळगता त्यांच्याशी संवाद साधायला हवा. आपल्या पाल्याच्या कलागुणांना ओळखून त्याचं भविष्य रंगवायला हवं ,
मुलांना केवळ  परीक्षार्थी न बनविता ज्ञानार्थी बनवलं जायला हवं तरच मुलं स्वच्छंदी बनतील.