फायदे सूर्यनमस्काराचे
आजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय. बॉलीवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अँण्ड फाईन ठेवण्यासाठी वर्कआऊट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज आहे. नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसने आहेत. बारा आसने करताना बारा श्लोकांचे उच्चारण होते. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घातल्यास अत्यंत कमी अवधीत चांगले परिणाम दिसून येतात. सुरुवातीला एका वेळी तीन
नमस्कार घालून नंतर संख्या वाढवली जाते.
Post Views:
2,310
Related Posts
-
का करावं स्विमिंग?
No Comments | Oct 22, 2014 -
मेथी
No Comments | Feb 3, 2016 -
झोप येत नसल्यास करा उपाय
No Comments | Sep 22, 2014 -
पाणी पिताय ना?
No Comments | Oct 12, 2014