मशरूमची भाजी (अळंबी)
|१) पांढरे मशरूम एक पाकीट
२) चार मध्यम कांदे , दोन टी. स्पून तेल
३) पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट
४) एक चमचा गरम मसाला
५) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) मशरूम ताजे पाहून घ्यावेत . हाताला थोडासा मैदा लावून मशरूमला चोळून ते धुवून घ्यावेत . मशरूमचा वरचा गोल कापून त्याचे लहान तुकडे करावेत . देठाचे पण तुकडे करावेत . कांदा मध्यम चिरून घ्यावा .
२) तेल गरम करून कांदा टाकून चांगला नरम करावा . त्यात हळद , तिखट , मीठ टाकून मसालाही टाकावा . मशरूमचे तुकडे टाकून परतून घ्यावे .
३) मशरूम शिजायला वेळ लागत नाही . ही भाजी परतून करावी . झाकण ठेऊ नये . मशरूममध्ये पाणी सुटेल . ही भाजी लोखंडी तव्यात जास्त चविष्ट होते .