मिश्र भाजी

साहित्य :-mix bhaji

१)      ढोबळी मिरच्या (सिमला मिरच्या) चार

२)     फ्लॉवर अर्धा किलो , मोठे बटाटे दोन

३)     कांदे मध्यम तीन , लाल टोमाटो दोन-चार

४)     गाजर एक , मुळा एक

५)    थोडासा श्रावण घेवडा

६)      वांगी दोन मध्यम , (यात कोबी , लाल भोपळाही चालतो .)

७)    लसून पाकळ्या सात-आठ

८)     आलं एक इंच , तेल दोन डाव

९)      फोडणीचं साहित्य , चवीपुरतं मीठ

१०)  धने-जिरे पूड प्रत्येकी दोन चमचे

११)   आवडीप्रमाणे लाल तिखट एक वा दोन चमचे

कृती :-

१)      सर्व भाज्यांचे मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या .  हिंगाची हळद न     घालता फोडणी करा .

२)     त्यात आलं-लसूण वाटण घालून सर्व भाज्या एकत्र घालाव्या .  व्यवस्थित परतून भाजी झाकण न ठेवता शिजवावी . 

३)     नंतर मीठ घालून परत एक-दोन वाफा आणा .  भाजी शिजल्यावर त्यात धने-जिरं पूड , तिखट घालून हलवा .  कोथिंबीर बारीक चिरून वर पसरावी .