रणसंग्राम-२०१४

ran
महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभेची तयारी जवळपास सर्वच पक्षांनी केलेली दिसत आहे.मोदी लाटेन आघाडी सरकार पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे राज्यात युती सरकारची हवां आहे असं म्हटल तरी वावग ठरणार नाही.
कारण पक्षांतर्गत वाद विकोपाला जाऊन आघाडीचे अनेक दिग्गज पक्षांतराच्या मार्गावर आहेत.तर अनेक कार्यकर्ते नाराजीचे सूर लावीत आहेत.याचाच अर्थ असा कि देशात आणि राज्यात युतीसरकारचं प्रस्त जोरावर आहे.त्यामुळे युतीतली नेतेमंडळी डोहाळ जेवण घालतांना दिसत आहेत.तर दुसरीकडे गेल्या सहा वर्षांपासूनची रखडलेली विकासाची ब्लू प्रिंट येत्या ऑगष्ट मध्ये प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली, मोदींच गुजरात मोडेल पाहून भारावलेले राज ठाकरे एकेकाळी मोदींवर स्तुती सुमने उधळीत होते दरम्यान मोदिंची हवा ओसरत आहे आहे असं विधान त्यांनी केलं,कदाचित महाराष्ट्राची ब्लु प्रिंट गुजरातला लाजवणारी तर नाहीना?असा प्रश्न राजच्या ह्या टीकेमुळे निर्माण होतो.मात्र विकास करायला लोकांनी सत्ता हाती द्यायला हवी..”.दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजपात रस्सीखेच सुरु आहे.दरम्यान आमच्यात काही वाद नसल्याचं देवेंद्र फडणविसांनी स्पष्ट केलं खर मात्र जागा एकत्र लडवायची कि स्वबळावर… यावर मात्र घमासान आघाडीतही आहे आणि युतीमध्ये सुद्धा.
गेल्या पाच वर्षात झाले नाहीत एवढे ऐतिहासिक निर्णय शेवटच्या क्षणाला विद्यमान सरकार कडून घेण्यात आले,त्यात मराठा मुस्लीम आरक्षण असो वा पुणे विद्यापीठाला देण्यात आलेलं सावित्रीबाई फुलेंच नाव असो.उपक्रम स्तुत्य आहेत पण शिवस्मारकाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे.बघूया येणाऱ्या काळात निर्णय होतो कि पुन्हा दाबला जातो.पण आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पक्ष जीव तोडून मेहनत घेतील यात शंका नाही.