आलू टिक्की

 

alu tikkiसाहित्य :-

१)      चार बटाटे , लिंबू अर्धा

२)     चार ब्रेड स्लाईस

३)     अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

४)     चार ते पाच हिरव्या मिरच्या

५)    दोन चमचे मक्याचे पीठ

६)      थोडी हळद , तळण्यासाठी तेल

७)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत .  ब्रेड पाण्यात टाकावा व लगेच पाण्यातून काढून दाबून घ्यावा मग टो बटाट्यात टाकून ते मिश्रण एकजीव करावे .

२)     त्यात हिरवी मिरची बारीक चिरून , कोथिंबीर , हळद व लिंबू पिळून टाकावा .  चवीनुसार मीठ टाकावे .

३)     या मिश्रणाचे चपटे गोळे बनवून ते मक्याच्या पिठामध्ये घोळवावेत व तेलात तांबूस रंगावर तळावेत .  चिंच चटणीबरोबर अथवा सॉससोबत गरम-गरम खावेत .