चिकन मसाला

chicken

साहित्य :-

१)      एक चिकन किंवा अर्धा किलो ब्रेस्ट पिसेस किंवा लेग्ज पिसेस

२)     तीन ते चार मोठे कांदे बारीक चिरलेले

३)     दोन बटाट्याचे साल काढून मोठे तुकडे

४)     एक टेबल स्पून वाटलेले आले-लसूण

५)    तीन टोमाटो , कोथिंबीर

६)      एक चाथुर्थांश चमचा हळद

७)    दोन चमचे लाल तिखट

८)     एक चमचा गरम मसाला

९)      दोन लवंगा , एक तुकडा दालचिनी

१०)  एक ते दीड वाटी तेल

११)   दोन वेलच्या , चवीनुसार मीठ .

कृती :

१)      चिकनचे मोठे तुकडे करून घ्यावेत .  तेलात लवंग , दालचिनी , वेलचीची फोडणी      करून त्यात कांदा टाकावा .

२)     त्या फोडणीला सारखे परतत राहावे .  कांदा पारदर्शक तपकिरी रंगाचा झाल्यावर पाण्याचा थोडासा हबका मारावा म्हणजे कांदयाच्या रंग चांगला राहतो .

३)     आले-लसूण , चांगले परतून मग टोमाटो टाकून पाच मिनिटे परतावे .  लाल तिखट , गरम मसाला , मीठ टाकून चांगले परतून घ्यावे .

४)     नंतर चिकनचे तुकडे , बटाटे टाकून बराच वेळ परतावे .  मग झाकणावर पाणी ठेवून मंद शिजवावे .  रंग छान येतो .

५)    झाकणावरचे पाणी थोडे थोडे आत टाकावे .  बेताचा रस्सा ठेवावा .  चिकन वाढताना वरून कोथिंबीर चिरून टाकावी .  हा चिकन मसाला सहा माणसांना पुरेल .