6

गाजर हलवा

साहित्य :-gajar-ka-halwa

१)      अर्धा किलो गाजर

२)     दीड पावशेर साखर

३)     एक वाटी तूप

४)     काजू व बदामचे काप पाव वाटी

५)    जायफळ , दोन चमचे वेलदोडे पूड

६)      एक पेलाभर दुध .

कृती :-

१)      प्रथम गाजर धुऊन घ्यावीत , व कोरडे करून किसून घ्यावीत .  गाजराचा कीस     तुपात तांबूस होईपर्यंत परतावा .

२)     या परतून घेतलेल्या मिश्रणात दुध ओतावे व साखर टाकून एकसारखे हलवत राहावे .

३)     मिश्रण घट्ट होत आले की वरून जायफळ व वेलदोडे पूड टाकून काजू व बदामाचे काप टाकून सर्व्ह करावे .

Filed in: नाश्ता चे प्रकार Tags: , , , , , ,
© 2014 m4marathi. All rights reserved. XHTML / CSS Valid. | Privacy Policy |