लग्न करायचे ?शोध सुरु करा मंगलाष्टक.कॉम वर

सौंदर्यवर्धना

Home Made beauty Tips in marathi
Home Made beauty Tips in marathi

स्वयंपाकघरातील पदार्थापासून सौंदर्यवर्धनाचे उपचार

सौंदर्याची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीला मनापासून वाटत असते .  प्रथम मुलांची काळजी व नंतर घरातील इतर जणांची काळजी घेताना गृहिणी स्वत:लाच विसरतात .

चाळीशी आली की त्वचा , डोळे , केस यांच्या विविध तक्रारी सुरु होतात .  ब्युटीपार्लर मध्ये वारंवार जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्हींची कमतरता जाणवते .

पण प्रत्येक गृहिणींच्या हे लक्षात येत नाही की , स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा सौंदर्यवर्धनासाठी खूप उपयोग होतो .

स्वयंपाकघरातील पदार्थापासून स्वाद , गंध व शरीर-मनाची तृप्ती करणारे अन्नपदार्थ बनवले जातात .  पण आपल्या रूपासाठी वेगळा एकही पैसा खर्च ण करता उपचार होतात .  दुध , दही , तूप , मध , विविध भाज्या डाळी इ. पासून स्त्रियांना आपले सौंदर्य जोपासता येते .

१)      सकाळी दुध तापविण्यापूर्वी तीन ते चार टेबल स्पून दुध वातीत काढावे .  ह्या दुधाने चेहरा , मान , गळा सर्व ठिकाणी चोळावे .  घरगुती क्लिन्झिंग होऊन त्वचा साफ होते .  या दुधात हळदीची चिमुट , ज्येष्ठमध , अनंतमूळ , चंदन , गुलाब , खस , मंजिष्ठ , नीम , संत्रासाल , तुळशी , पुदिना यापैकी एक पावडर अर्धा टेबल स्पून टाकून चेहऱ्याला लावावे .  हे जमले नाही तर हळकुंड , चंदन इ. सहाणीवर उगाळावे .  वाटल्यास त्यात बदाम उगाळावे , किंचित केशर टाकून दुधात मिसळून चेहऱ्यावर , मानेवर हातांना व गळ्याला चोळून लावावे .  सुकले की चेहरा चोळून्न धुवावा .

२)     हातांची नखे , ओठ यांना दुधाची साय लावावी .  साय लावल्यामुळे नखे मऊ राहतात .  ओठांना भेगा पडत नाही व ते देखील मऊ होतात .

३)     दही हे सौंदर्य वाढीसाठी उपयुक्त आहे .  त्वचेचे नैसर्गिक आवरण म्हणजेच आम्ल आच्छादन अबाधित ठेवण्यास दही काम करते . Lactobasilus हे दह्यातील गुणधर्म त्वचेचे पोषण करतात , तर एन्झाइममुळे Natural क्लिन्झिंग होते .  यात चंदन/लव्हेंडर/रोज असे सुगंध टाकून त्वचेला लावल्यास तेलकटपणा जाऊन त्वचा उजळते .  दही केसांना पण उपयोगी आहे .

४)     लोणी काढल्यावर एक टेबल स्पून लोण्याने चेहरा , हात , गळा , डोळ्याच्या आजूबाजूनं मसाज करावा .  मसाजची दिशा खालच्या बाजूने वरच्या बाजूला व आतून बाहेर अशी असावी .  त्यातही वाळा/गुलाब तेल टाकून सुगंधी करावे .

५)    साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे .  हिरड्यांना मसाज करावा .  ओठांना लावावे .  खूप फायदा होतो .  तूप मात्र घरगुती , लोणकढे घ्यावे .