चटकदार मिसळ

chatakdar misal

साहित्य :-

१)      मोड आलेले धान्य पाव किलो

२)     दोन बटाटे , तीन मोठे कांदे

३)     चार ते पाच हिरव्या मिरच्या

४)     एक वाटी ओल्या नारळाचा चव

५)    दीड वाटी चिरलेली कोथिंबीर

६)      तिखटपूड , हिंग , दोन लिंबू

७)    मोहरी , हळद , दोन टोमाटो

८)     कढीपत्ता दहा ते बारा पाने

९)      आले-लसूण पेस्ट एक चमचा

१०)  फरसाण व शेव १२५ ग्रॅम

११)   चवीनुसार मीठ , तेल .

कृती :-

१)      मोड आलेले धान्य थोडेसे भाजून घ्यावेत .  बटाटा , टोमाटो , कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे .  लिंबू चिरून ठेवावेत .

२)     पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी , जिरे , कढीपत्ता , मिरची , हळद , तिखटपूड , आले-लसूण पेस्ट टाकावी .

३)     नंतर त्यात बटाटा , टोमाटो टाकून मोड आलेले धान्य टाकून दोन मिनिटे ढवळत    राहावे . हवे असेल तेवढे गरम पाणी टाकून शिजवावे .

४)     सर्व्ह करताना वरून कोथिंबीर , शेव , कांदा व फरसाण टाकून ब्रेडसोबत खाण्यास दयावे .